व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिवसम्राट प्रतिष्ठान वर्धापन दिन आणि स्व. भाऊ लायगुडे यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर; उद्घाटक सुधाकर शेळकेंचेही रक्तदान

मावळ तालुक्यातील आजिवली येथील शिवसम्राट प्रतिष्ठान यांचा नववा वर्धापन दिन आणि कार्याध्यक्ष स्व. भाऊ लायगुडे यांच्या स्मरणार्थ आजिवली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 25, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Blood-Donation-Camp

Photo : Sachin Shinde


मावळ तालुक्यातील आजिवली येथील शिवसम्राट प्रतिष्ठान यांचा नववा वर्धापन दिन आणि कार्याध्यक्ष स्व. भाऊ लायगुडे यांच्या स्मरणार्थ आजिवली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल शेळके यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्या हस्ते करण्यात आले होते. सलग नऊ वर्ष आजीवली गावातील तरुण रक्तदानाचा उपक्रम राबवत असल्यामुळे मावळ तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षातील मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली होती. ( Shiv Samrat Pratishthan Anniversary And In Remembrance Let Bhau Laygude Blood Donation Camp At Ajivali Maval )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पवनमावळ विभागातील अत्यंत छोटे आणि दुर्गम खेडे असलेल्या या गावात तब्बल 64 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. महत्वाचे म्हणजे यावेळी उद्योजक सुधाकर शेळके यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून स्वतः देखील रक्तदान केले. अजीवली गावात होत असलेल्या या उपक्रमाबाबत बोलताना सुधाकर शेळके म्हणाले की, ‘ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यासाठी महिला आणि पुरुष एकत्र येत आहेत, याचा सार्थ आनंद होतो आहे. आजिवली गावाचा आदर्श आपल्या तालुक्यातील इतर गावांनी देखील घेतला पाहिजे.’

‘रक्तदानासाठी तरुणांनी उभी केलेली ही चळवळ अत्यंत मोलाची आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अजीवली गावातील हा उपक्रम अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याने पुढील काळात आरोग्यविषयक या गावातील कोणती समस्या असल्यास संपूर्ण गावाचे आरोग्य तपासण्या करण्यासाठी गाव जो वेळ देईल त्या वेळेत आम्ही तपासण्या मोफत करून घेऊ,’ असे आश्वासन सुधाकर शेळके यांनी यावेळी दिले. या कार्यक्रमासाठी एस.आय. रक्तपेढी पिपंरी चिंचवड यांचे अमूल्य सहकार्य झाले. ( Shiv Samrat Pratishthan Anniversary And In Remembrance Let Bhau Laygude Blood Donation Camp At Ajivali Maval )

हेही वाचा – प्रजासत्ताक दिनी गणवेशात हजर राहता यावे म्हणून आजिवली शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लबकडून शालेय गणवेशाचे वाटप

यावेळी माजी सभापती निकिता घोटकुले, मावळ तालुका मनसे अध्यक्ष रुपेश म्हाळस्कर, सभापती नंदकुमार धनवे, संभाजी राक्षे, नरेंद्र  ठाकर, संतोष  कडू, माजी सरपंच सचिन शिंदे, ज्ञानेश्वर डफळ, रामदास गोणते, चेअरमन सचिन संभाजी शिंदे, नवनाथ गोणते, धोंडूभाऊ जाधव, अंकुश लायगुडे, उपसरपंच, छाया गोणते, रुपाली लायगुडे, मुक्ताबाई थोरवे, पोलीस पाटील रुपाली लायगुडे, रोशना गोणते, कल्पना लायगुडे, अनंता महाराज लायगुडे, तानाजी लायगुडे, रवी लायगुडे, गणेश पाटील सर, काझी सर, सुनील केंडे, संभाजी केंडे, दत्ता गोणते, राजू लायगुडे अनिल लायगुडे, महेश लायगुडे, किसन लायगुडे, संभाजी लायगुडे, संतोष लायगुडे, देविदास लायगुडे, मनोज शिंदे, शेखर लायगुडे, निखिल लायगुडे, नारायण केंडे, भरत ओव्हाळ, बबाबाई लायगुडे, बबन शिंदे, पांडुरंग उंबरकर, संतोष केंडे, आनंता केंडे, मधुकर केदारी, शत्रुघ्न लायगुडे, सचिन लायगुडे, रमेश मोरे, रवींद्र उंबरकर, विशाल ओव्हाळ, रोहिदास लायगुडे, नितीन लायगुडे, उत्तम लायगुडे, शंकर जाधव आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी लायगुडे यांनी केले तर आभार अनंता लायगुडे यांनी मानले.

अधिक वाचा –

– मावळच्या दोन तरूणांची जबरदस्त कामगिरी; तालुक्यात आढळणाऱ्या 36 जातीच्या सापांबद्दल शोधनिबंध प्रसिद्ध, नक्की वाचा
– मावळ तालुका हादरला! मावस भावाकडून अल्पवयीन बहिणीचे लैंगिक शोषण, गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस
– पवनानगरमध्ये शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी; विद्यार्थ्यांना खाऊ आणि रुग्णांना फळांचे वाटप


Previous Post

कार्यक्षम अधिकारी डॉ. योगेश म्हसे रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी रुजू, म्हसेंच्या नियुक्तीने रायगडकरांच्या अपेक्षा उंचावल्या

Next Post

अंधाऱ्या रात्री दुचाकीसह दरीत कोसळलेल्या तरुणाला वाचवण्याचा थरार, मुंबई-पुणे महामार्गावर शिंग्रोबा मंदिराजवळील घटना

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Bike-Accident-Old-Mumbai-Pune-Highway

अंधाऱ्या रात्री दुचाकीसह दरीत कोसळलेल्या तरुणाला वाचवण्याचा थरार, मुंबई-पुणे महामार्गावर शिंग्रोबा मंदिराजवळील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP Subhash Jadhav elected as chairman of Maval Taluka Agricultural Produce Market Committee NCP shocked

मावळ तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का ! संख्याबळ असूनही बाजार समितीच्या सभापती पदी भाजपच्या सदस्याची बहुमताने निवड

March 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

द्रुतगती मार्गावरील ३० तासांच्या वाहतूक कोंडीची समितीकडून चौकशी सुरू ; मुंबई-पुणे मिसिंग लिंक मे महिन्यात खुला करण्याचे नियोजन

March 26, 2026
CM and both Deputy Chief Ministers distributed eighth installment of Shetkari Mahasamman Nidhi Yojana

शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक खाते तपासा ! मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे वितरण

March 26, 2026
RTO-Pimpri-Chinchwad

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे ? RTO कडून एप्रिल महिन्याचे वेळापत्रक जाहीर – पाहा आवश्यक कागदपत्रे

March 26, 2026
A beacon of historical research has been lost Senior historian Dr Jaysingrao Pawar Passes Away

Dr Jaysingrao Pawar Passes Away : इतिहास संशोधनातील दीपस्तंभ हरपला ! ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

March 26, 2026
Vadgaon Maval Police Station

मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक

March 25, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.