शिवसेना महिला आघाडी आणि युवासेना आयोजित ‘बये दार उघड’ मोहीम आज (मंगळवार, 4 ऑक्टोबर) पुणे जिल्ह्यातील एकविरा देवीच्या दर्शनाने समाप्त झाली. यावेळी विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ( Shiv Sena Baye Dar Ughad Campaign Concluded At Ekvira Devi at Karla )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘शिवसेना परिवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सर्व कुटुंबियांच्या श्रध्दास्थानी असलेल्या श्री एकविरा देवीच्या दर्शनाने आज मनाला वेगळेच समाधान लाभले. एकविरा देवस्थानचे असलेले प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही लवकरच विधिमंडळात लवकरच एक बैठक घेऊ. या बैठकीसाठी स्थानिक शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांना निमंत्रित करण्यात येईल,’ असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी केले.
‘एकविरा देवीच्या मंदिरातील कळस चोरी झाल्याच्या प्रश्नांवर मी पाठपुरावा केला होता. पुढील वर्षीच्या नवरात्रात देवीच्या मूळ दागिन्यांसह पूजा व्हावी हीच इच्छा आहे. याबाबत मा उच्च न्यायालयाने आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाने योग्य ती कार्यवाही होण्यासाठी लक्ष घालावे,’ अशी यावेळी गोऱ्हे यांनी केली.
अधिक वाचा –
रेशन कार्ड धारकांनो; स्वस्त धान्य नक्की घ्या, पावत्याही आठवणीने घ्या, कुणाला किती धान्य मिळते? असे करा चेक
‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 62 हजाराहून अधिक सेवांची निर्गती