Dainik Maval News : पुण्यातील स्वारगेट बस डेपोत काही दिवसांपूर्वी एका तरुणीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने लोणावळा बस स्थानकाच्या सुरक्षेबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लोणावळा बस डेपोची पाहणी करून तेथील सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी, बस डेपोमध्ये अतिरिक्त सुरक्षा रक्षक नियुक्त करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली.
त्यानंतर, प्रतिनिधींनी लोणावळा बस डेपो व्यवस्थापकांना निवेदन देऊन आवश्यक त्या सुरक्षाविषयक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच, लोणावळा शहर पोलीस ठाण्यात जाऊन, स्वारगेट घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
- लोणावळा बस स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी, अशी विनंती पोलिसांकडे करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देखील पक्षाच्या वतीने देण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी पुणे जिल्हा सहसंपर्क संघटक श्रीमती शादान चौधरी, शिवसेना लोणावळा शहरप्रमुख परेश बडेकर, शिवसेना शहर समन्वयक जयवंत दळवी, शिवसेना शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे, भगवान देशमुख, शिवसेना उपशहर प्रमुख विजय आखाडे, नरेश काळवीट, विभाग प्रमुख संजय उर्फ पिंटू शिंदे, विभाग संघटक गणेश फरांदे, महिला आघाडी उप शहर संघटक प्रतिभा कालेकर, महिला आघाडी विभाग संघटक शोभा चव्हाण व शिवसेना आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक