शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मावळ लोकसभा उपजिल्हाप्रमुखपदी रोमी संधू यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे सचिव तथा खासदार अनिल देसाई यांनी ही निवड जाहीर केली. मात्र, रोमी संधू यांच्या निवडीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकारी, शिवसैनिक नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Apointed Romi Sandhu as Maval Lok Sabha Deputy District President )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शनिवारी (19 नोव्हेंबर) मावळ लोकसभेच्या 6 पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली. या पदाधिकाऱ्यांमध्ये रोमी सिंधू यांची निवड झाल्याने ठाकरे गटातीलच काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना समन्वयक माधव मुळे, अल्पसंख्याक विभाग शहर प्रमुख दस्तगीर मणियार, विभाग संघटक खंडू शिरसाट, विभाग प्रमुख अनिल पारचा, दीपक कांबळे, माजी विभाग प्रमुख विष्णू साळवे आदी पदाधिकारी यांचा यात समावेश आहे.
नाराज पदाधिकाऱ्यांनी त्यांची नाराजी माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्याकडे व्यक्त केली असून चाबुकस्वार यांनी शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, आमदार सचिन अहीर आणि युवा सेनेचे पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख वैभव थोरात यांच्याशी संपर्क साधून ही बाब कळवली असल्याचे सांगितले जात आहे.
अधिक वाचा –
– “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींना तात्काळ हटवा !”
– माऊलींचे दर्शन घेऊन आळंदीहून पेणला जाणाऱ्या भाविकांच्या बसचा अंडा पॉइंटजवळ अपघात