चालू वर्षात आगामी लोकसभा निवडणूक, राज्याची विधानसभा निवडणूक, नगरपालिका तसेच तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या संदर्भात मावळ लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शन मेळावा लोणावळा येथे संपन्न झाला. शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर आणि शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा पार पडला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी माजी आमदार तथा शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, मावळ तालुका संपर्कप्रमुख प्रभाकर पवार, महिला आघाडी संघटिका लतिका पाष्टे आदी प्रमुख उपस्थि होते. लोणावळा येथील हॉटेल चंद्रलोक इथे हा शिवसेनेचा मेळावा संपन्न झाला. यावेळी संजोग वाघेरे यांची शिवसेना मावळ लोकसभा संघटक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शिवसेना मावळ तालुका आणि लोणावळा शहराच्या वतीने खास सत्कार करण्यात आला. ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party Office Bearer Meeting At Lonavla Maval )
खुप कमी वेळात संजोग वाघेरे पक्षवाढीसाठी झटू लागलेत –
“संजोग वाघेरे यांना पक्षाने जिल्हा संघटक मावळ लोकसभेची जबाबदारी दिली आहे. या पूर्ण भागाची संघटन जबाबदारी दिलेली आहे. कमी वेळात त्यांनी जनसंपर्क वाढवून पक्ष वाढीचे काम सुरू केले आहे. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्याबद्दलची एक आपुलकी वाढू लागली आहे. मात्र उमेदवारी बाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील,” असे सचिन अहिर यांनी बोलताना नमूद केले.
अधिक वाचा –
– आता कितीही पाऊस पडू दे आणि कितीही पूर येऊदे!! वाडिवळेसह ‘या’ 9 गावांची चिंता कायमची मिटली । Maval News
– नानोली तर्फे चाकण इथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न; दत्तात्रय पडवळ यांच्यामार्फत सर्व विजयी स्पर्धकांना टीशर्ट वाटप
– श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त वडगावमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम, हजारो दिव्यांनी उजळणार पोटोबा मंदिराचे प्रांगण । Vadgaon Maval