शिवसेनेचे (ठाकरे गट) पुणे जिल्ह्यातील जुणे जाणते नेते आणि मुळशी तालुक्यातील प्रमुख नेते असलेले बाळासाहेब चांदेरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतचे पत्रक पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आले आहे. ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party Pune District Chief Balasaheb Chandere expulsion )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पक्षाचे सचिव खासदार विनायक राऊत यांच्या सहीचे हे पत्र असून यात, ‘पुणे जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख श्री. बाळासाहेब चांदेरे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे माननीय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.’ असे म्हटले आहे.
बाळासाहेब चांदेरे हे मागील अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटाशी संलग्न राहुन कारभार करत असल्याचे समोर आल्याने पक्षाने कारवाई केल्याचे बोलले जात आहे. चांदरे यांनी देखील आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याची माहिती समोर येत आहे.
दैनिक मावळ – विशाल कुंभार (संपादक)
अधिक वाचा –
– देव तारी त्याला कोण मारी! खंडाळ्यात ट्रेकिंग दरम्यान दरीत कोसळलेल्या ओडिशाच्या ‘हरिश्चंद्र’ला रेस्क्यू टीम्सकडून जीवदान
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत भाजपा आणि काँग्रेसची युती? राज्यात होतेय चर्चा! एकूण 40 उमेदवार रिंगणात