खंडाळा येथील मंकी पॉइंटवर ट्रेकिंग दरम्यान पाय घसरुन दरीत कोसळलेल्या आणि झाडाला अडकून राहिलेल्या तरुणाचा जीव वाचवण्यात रेस्क्यू टीम्सला यश आले आहे. शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था रायगड यांच्या संयुक्त ऑपरेशनमुळे हरिश्चंद्र मंडल (वय 25 सध्या रा. गोवा, मुळ गाव ओरिसा) या तरुणाचा जीव वाचला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, हरिश्चंद्र हा गोवा येथे क्रॉम्प्टन कंपनीमध्ये सुपरवायझर पोस्ट वरती काम करतो. तो खंडाळा घाटामध्ये ट्रेकिंग साठी आला होता. मात्र रस्ता चुकला आणि अंधार झाल्याने त्याचा पाय घसरला त्यामुळे तो खोल दरीमध्ये पडला आणि एक झाडाला अडकून राहिला. तेव्हा त्याने त्या ठिकाणाहून त्याने ज्या रिक्षा मधून घाटात फिरण्यासाठी आला होता, त्या रिक्षा चालकाशी संपर्क केला. आपल्याला मदतीची गरज आहे असे सांगितले. ( young man who fell into valley at monkey hill khandala saved by rescue teams )
रिक्षा चालकाने लोणावळा पोलीस स्टेशन आणि शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर शिवदुर्गचे कॅप्टडनव सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवदुर्ग मित्र मंडळाची टीम, वन्य जीवरक्षक दल मावळ आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य मदतीला आले. सर्वांनी अत्यंत कसोशीचे प्रयत्न करून त्या युवकाला सुखरूप बाहेर काढून लोणावळा पोलिसांच्या हवाली केले आहे.
शिवदुर्ग मित्र लोनावळा, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी रेस्कु टीम:
1)महेश मसने 2)सचिन गायकवाड सर 3)योगेश उंबरे 4)सनी कडू 5)सुरज वरे 6)योगेश दळवी 7)आदित्य पिलाने 8)प्रणय अंबुरे 9) राहुल दुर्गे 10) समीर जोशी 11) हर्ष तोंडे 12)प्रिन्स बेठा 13)कपिल दळवी 14)सिद्धेश निषाळ 15)हरिश्चंद्र गुंड 16)मधुर मुंगसे 17)अशोक उंबरे 18)अमित गोतरणे 19) साहिल दळवी 20) विघ्नेश ढोकळे 21)आकाश भांगरे 22) अतिष भांगरे 23)शुभम काकडे 24)कौशल दुर्गे 25)गणेश जाधव 26) साहील ढमाले 27)अनिल आंद्रे 28) गणेश निसाळ 29)सत्यम सावंत 30)कुणाल कडु 31)सागर कुंभार 32)रितेश कुडतरकर 33)महादेव भवर 34) चंद्रकांत बोंबले 35) आनंद गावडे 36)अनिल सुतार 37) गणेश फाळखे 38)अमोल सुतार 39)दिलीप गदिया 40) रतन सिंग 41) मयूर दळवी 42)अतुल लाड 43)मनोहर ढाकोळ 44)दीपक बोराडे 45) मयूर निगड 46) अशोक कुटे 47) सुनील गायकवाड 48) गणेश ढोरे 49) विनय सावंत 50)विकी दौंडकर 51)साहील नायर 52)साहील लांडगे 53)अनिश गराडे 54) निलेश संपतराव गराडे आणि गुरुनाथ साठीलकर, रायगड.
दैनिक मावळ – विशाल कुंभार (संपादक)
अधिक वाचा –
– सोहळा कृतज्ञतेचा! बोरघाट बस अपघातात देवदूत बनून धावलेल्या विविध रेस्क्यू टीमच्या सहकाऱ्यांचा खास सन्मान
– आंदर मावळ आणि नाणे मावळला जोडणाऱ्या रस्त्यासाठी सात कोटींचा निधी – आमदार सुनिल शेळके