मावळ तालुक्यात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या वतीने गावभेट दौरा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. रविवारी (दिनांक 15 जानेवारी) शिवसंपर्क गाव भेट दौऱ्याचे आयोजन शिवसेना कुसगाव, वरसोली विभाग आणि लोणावळा शहर या ठिकाणी करण्यात आले होते. यात शिवसंपर्क गाव भेट दौऱ्याचा शुभारंभ कुरवंडे गावातून करण्यात आला. यावेळी प्रत्येक गावात, शहरात शिवसंपर्क गाव भेट दौऱ्याचे आणि तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. ( Shiv Sena Uddhav Thackeray Group Shiv Sampark Village Visit Campaign In Maval Taluka )
अभियानांतर्गत शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकारी आणि शिवसैनिकांसोबत गावोगावी जाऊन संवाद साधण्यात आला, तसेच शिवसेना पक्षप्रवेश व शिवसेना, युवासेना शाखा नामफलक अनावरण, नवनिर्वाचित शिवसेना पदाधिकारी नियुक्ती आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष भाऊ ठोंबरे, सल्लागार भारत ठाकुर, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका शैलाताई खंडागळे, युवासेना तालुका अधिकारी विजय तिकोणे, उपतालुकाप्रमुख अनिल ओव्हाळ, समन्वयक रविंद्र गायकवाड, शिवसेना लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, तळेगाव शहरप्रमुख देव खरटमल, कामशेत शहरप्रमुख सतिश इंगवले, मा शहरप्रमुख गणेश भोकरे, शहरप्रमुख सिध्देश नलावडे, महाराष्ट्र वाहतूक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश केदारी, अवघड वाहतूक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष हेमंत मेने, अवजड वाहतूक सेना पुणे जिल्हा संघटक नरेश काळवीट, शिववाहतुक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष पंकज खोले, विभाग संघटक एकनाथ जांभूळकर, विभाग संघटक उमेश गावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा – अरे व्वाह..! आता अवघ्या 3 मिनिटात श्री एकविरा देवीच्या गडावर जाता येणार, वाचा सविस्तर
तसेच, विभाग प्रमुख अशोक निकम, सतिश गरूड, विभाग प्रमुख काळु हुलावळे, विभाग प्रमुख राम सावंत, शिवसेना लोणावळा उपशहरप्रमुख संजय भोईर, समन्वयक जयवंत दळवी, सल्लागार रामभाऊ थरकुडे, युवासेना शहर अधिकारी तानाजी सुर्यवंशी, समन्वयक दत्ता थोरवे, उपशहर अधिकारी संतोष मेंढरे, उपशहरप्रमुख मनेष पवार, विभाग समन्वयक अशोक गवारणे, शाखाप्रमुख गणेश वाडकर, उपविभाग प्रमुख यशवंत येवले, उपविभाग प्रमुख संतोष लांगे, उपविभाग प्रमुख प्रमोद वाशिवले, वाकसई शाखाप्रमुख चंद्रकांत मडके, शाखाप्रमुख नितीन म्हसकर, संतोष गिरी, संजय आंबेकर, मा. उपविभाग प्रमुख ज्ञानदेव जांभुळकर, जितेंद्र राऊत, डोंगरगाव चे सरपंच सुनिल येवले, मा.सरपंच चंदाराणी राऊत, सदस्य सनी हुलावळे, कुरवंडे शाखाप्रमुख भरत खिलारे, वेहेरगाव कैलास पडवळ, सुधाकर येवले, बाबुराव शेळके, सुर्यकांत ढाकोळ;
कुणेगाव शाखाप्रमुख शिवाजी लांडगे, सुनिल मातेरे, राजेश जांभुळकर, गणेश तिकोणे, मदन मातेरे, मंगेश कडू, गणेश मातेरे, निलेश खिलारे, युवासेनेचे अक्षय साबळे, केवरे शाखाप्रमुख कृष्णा शिळवणे, मा उपसरपंच सुभाष खोले, संजय विकारी, अवजड वाहतूक सेना सचिव योगेश गोसावी, कुसगाव शाखा प्रमुख श्री शिवाजी गाडे उपशाखा प्रमुख शंकर वाजे, डोंगरगाव शाखाप्रमुख निलेश येवले, धीरज घारे, उपशाखा प्रमुख कमलेश गाडवे,मळवली शाखा प्रमुख विजय कांबळे निखिल कांबळे आणि सर्व कुसगाव वरसोली विभागातील व लोणावळा शहरातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व वाहतूक सेना व सर्व आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक बहुसंख्येने शिवसंपर्क गाव भेट दौऱ्यात उपस्थित होते. ( Shiv Sena Uddhav Thackeray Group Shiv Sampark Village Visit Campaign In Maval Taluka )
अधिक वाचा –
– खुशखबर! राज्याचा गौरव वाढवणाऱ्या पैलवानांच्या मानधनात तीनपटीने वाढ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड भागातील विकासकामांचा आमदार शेळकेंकडून आढावा; किन्हई, चिंचोलीचा पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन