Dainik Maval News : वडगाव मावळ येथील बाफना कुटुंबातील शिवम बाफना आता महक ऋषी म्हणून ओळखला जाईल. शुक्रवारी (दि.14) श्रमण संघीय युवाचार्य भगवंत महेंद्र ऋषीजी महाराज यांच्या निश्रायने आणि शंभराहून अधिक जैन साधू-साध्वी वृंदांच्या सानिध्यात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत ओगा स्वीकारून हा ऐतिहासिक दीक्षा समारंभ पार पडला.
यावेळी युवाचार्य महेंद्र ऋषीजी महाराज म्हणाले, “संयम ही मानवी जीवनाची सर्वोत्तम साधना आहे. संयम आत्म्याला शुद्ध करतोच, पण समाज आणि जगाच्या कल्याणाचाही मार्ग दाखवतो. संयमाचे जीवन कठीण असले तरी तेच खऱ्या आनंदाचा आणि आत्मिक शांततेचा मार्ग आहे. संयमाने आत्मा जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो आणि सद्गती प्राप्त करतो.”
मालवा प्रवर्तक प्रकाश मुनिजी, उपप्रवर्तक अक्षय ऋषीजी, बरसादाता गौतम मुनिजी आणि उपस्थित साध्वी वृंदांनी संयम आणि धर्माचे महत्त्व साध्या आणि सोप्या भाषेत समजावले. त्यांनी सांगितले की, “संयम साधनेचा मार्ग असा आहे, ज्यामुळे व्यक्ती नरातून नारायण बनू शकतो.”
या भव्य दीक्षा समारंभासाठी देशभरातून हजारो श्रावक-श्राविकांनी हजेरी लावली. वडगावचा संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता, जणू ते प्रती प्रयागराज तीर्थ बनले होते. हितेन्द्रऋषिजी महाराजांनी सांगितले की, 20 फेब्रुवारी रोजी लोणावळ्यात नवदीक्षित महक ऋषीजी महाराजांची मोठी दीक्षा होणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– चालकाचे प्रसंगावधान, दुचाकीस्वारांची मदत अन् पोलिसांची सतर्कता ; देहूरोड येथे पेटलेल्या ट्रकचा सिनेस्टाईल थरार । Dehu Road News
– दहावी व बारावी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज ‘आपले सरकार’ प्रणालीद्वारे 10 मार्च पर्यंत स्वीकारले जाणार
– सेवा रस्त्यालगतच्या व्यवसायिकांच्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा ; रस्त्यात वाहने उभी केली जात असल्याने नागरिक त्रस्त