Dainik Maval News : रायगड जिल्हा पोलीस आयोजित रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत जीवनदूत सन्मान सोहळा 2025 या कार्यक्रमात शिवदुर्ग मित्र लोणावळा रेस्कू टीमचा सन्मान करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षापासून शिवदुर्ग मित्र लोणावळा रस्ते अपघातात, दऱ्याखोऱ्यात होणाऱ्या अपघात सतत मदत करीत आहेत. याच कार्यांची दखल घेऊन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सन्मान करण्याचे योजिले होते.
सदर कार्यक्रमात भरतशेठ गोगावले, राज्य मंत्री रोजगार हमी योजना यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच आमदार धैर्यशील पाटील, आमदार महेंद्र दळवी, यांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला.
सन्मान स्विकारताना शिवदुर्ग मित्र लोणावळा रेस्कु टिमचे उपाध्यक्ष महेश मसने, संचालक राजेंद्र कडु, संचालक दिनेश पवार, संचालक योगेश उंबरे उपस्थित होते. शिवदुर्ग मित्र लोणावळा च्या कार्याची योग्य दखल घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी हा सन्मान केला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कार्यालयाचे बांधकाम पूर्ण ; लवकरच भव्य सोहळ्यासह होणार लोकार्पण
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन
– पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत मावळातील सात मल्लांनी पटकाविली पदके ; तीन पैलवानांची ‘महाराष्ट्र केसरी’साठी निवड