Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने दररोज वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची युती होणार की नाही होणार, याबाबत संभ्रम कायम असताना आज ( दि. १४ ) शिवशक्ती आणि भीमशक्ती अर्थात शिवसेना ( एकनाथ शिंदे ) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट) यांच्या युतीची घोषणा करण्यात आली.
मावळ लोकसभेचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि आरपीआयचे प्रदेश सरचिटणीस सुर्यकांत वाघमारे यांच्या उपस्थितीत लोणावळा नगरपरिषद निवडणुकीसाठी युतीची घोषणा करण्यात आली. यासंदर्भात माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार बारणे यांनी सविस्तर माहिती दिली. त्यात त्यांनी लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना आणि आरपीआय हे दोन्ही पक्ष सोबत असून शिवसेना म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.
याठिकाणी सूर्यकांत वाघमारे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील आणि उर्वरित उमेदवार लवकर जाहीर केले जातील. सर्व उमेदवार हे शिवसेनेच्या चिन्हावर अर्थात धनुष्यबाण चिन्हावर लोणावळ नगरपरिषदेची निवडणुक लढविणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आढवले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढविणार असल्याचे सूर्यकांत वाघमारे यांनी सांगितले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांचा “तो” शब्द इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटाला देखील लागू होणार का? mla sunil shelke
– जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नगरपालिका व नगरपरिषदेच्या तयारीचा घेतला आढावा । Pune News
– खामशेत येथे वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला कंटेनर, एका महिला वारकरीचा मृत्यू, 10 जण जखमी । Kamshet Accident
