लोणावळा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोणावळा शहरात एक स्त्री जातीचे मृत अर्भक मिळून आले आहे. लोणावळा शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या मागील बाजूला असलेल्या एक्स्प्रेस हायवेच्या पुलाखाली नदीच्या कडेला एक नवजात स्त्री जातीचे मृत अर्भक लोणावळा पोलिसांना मिळून आले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक संदीप मानकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भादवी कलम 318 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोणीतरी अज्ञात व्यक्तीने स्त्री जातीचे नवजात अर्भक फडक्यात गुंडाळून स्त्री अपत्य जन्माची लपवणुक करण्याच्या हेतूने गुप्तपणे टाकून दिले होते. पोटच्या गोळ्याला अशा निर्दयीपणे टाकून देण्याचा हा प्रकार कोणी केला याचा शोध सुरू आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महादेव म्हात्रे करत आहेत. ( Shocking A newborn female infant was found in Lonavala city )
अधिक वाचा –
– विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांना वसंतराव नाईक महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
– सर्वोच्च न्यायालयात दिनांक 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन । Pune News
– महत्वाचे ! प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्याचे पारंपरिक बलुतेदार कारागिरांना आवाहन, जाणून घ्या योजनेची माहिती