Dainik Maval News : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन तरुणांनी एका तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करत खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास पैसा फंड काच कारखान्यासमोर तळेगाव दाभाडे येथे घडली.
मयूर अंकुश मते (वय 24, रा. तळेगाव दाभाडे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी मंगळवारी (दि. ७) या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम अनिल भोसले (वय 28), अक्षय अनिल भोसले (वय 29, दोघे रा. तळेगाव दाभाडे) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर मते यांचे आरोपींसोबत मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून मयूर यांना ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी लाकडी दांडके व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये मयूर गंभीर जखमी झाले. या भांडणात मयूर यांचा दात पडला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठा निर्णय : राज्यात सर्व चारचाकी वाहन धारकांना एक एप्रिलपासून फास्ट टॅग अनिवार्य
– महाराष्ट्र शासनाच्या कामकाजातील निर्णय प्रक्रीया सुलभ व गतीमान होणार ; प्रशासकीय कारभार बनणार अधिक पारदर्शक
– नवं सरकार, नवं धोरण : ‘ईज ऑफ लिव्हिंग’साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सात कलमी कृती कार्यक्रम