व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव नगरपंचायतीने आयोजित केलेल्या एकदिवसीय आरोग्य शिबिरात १८० हून अधिक महिलांचा सहभाग

"सशक्त महिला - निरोगी समाजाची पायाभरणी"

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 11, 2026
in लोकल, शहर
More than 180 women participated in a one-day health camp organized by Vadgaon Nagar Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महिला व बाल कल्याण समिती, वडगाव नगरपंचायत व विघ्नहर्ता हास्पिटल, वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.९ मार्च) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वडगाव कातवी शहरातील महिला भगिनींसाठी एकदिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर वडगाव नगरपंचायत कार्यालयात घेण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, सर्व नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी व नागरिक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. डॉ. प्रवीण निकम, मुख्याधिकारी वडगाव नगरपंचायत यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

शिबिरामध्ये डॉ. शुभांगी बहिरट, वैद्यकीय अधिकारी, डॉ. स्मिता पालवे, समुदाय आरोग्य अधिकारी, डॉ. विकास गोरख जाधवर MD, विघ्नहर्ता हॉस्पिटल, डॉ. जे. के. दानी, दानी Eye Clinic तसेच आशासेविका यांचेद्वारे हे आरोग्य शिबीर यशस्वीरीतीने पार पडले.

शिबिरामध्ये ईसीजी, हिमोग्लोबिन, किडनी, लिव्हर, बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, X-Ray, डोळे, कान, नाक, घसा, रक्त इत्यादी विविध तपासण्या विनामुल्य करण्यात आल्या. आरोग्य शिबिरात तपासणीसाठी येणाऱ्या प्रत्येक महिलेकरिता कॅल्शियम आणि Iron Folic acid tablet देण्यात आल्या. तसेच नागरिकांना शासनाकडून अनेक हितकारक शासकीय योजनांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून ५० स्रियांचे आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात आले. सदर शिबिराचा लाभ वडगाव शहरातील १८० पेक्षा जास्त महिलांनी घेतला.

जागतिक महिला दिनानिमित्त वडगाव शहरातील क्रीडा व आरोग्य क्षेत्रातील महिलांचा सत्कारही वडगाव नगरपंचायतच्या महिला व बाल कल्याण समितीमार्फत नगरपंचायत सभागृहात करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष्यपद नगराध्यक्षा अबोली ढोरे यांनी भूषविले. प्रास्ताविक महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनीता ढोरे यांनी केले.

वडगाव शहरातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दैदिप्यमान कामगिरी केलेल्या वडगाव शहरातील खेळाडू हर्षदा दुबे, रुचिका ढोरे, हर्षदा गरुड तसेच वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत डॉ. शुभांगी बहिरट, डॉ. स्मिता पालवे यांचा यथोचित सत्कार याप्रसंगी करण्यात आला.

वडगाव शहरातील आशासेविका, महिला सफाई कर्मचारी तसेच वडगाव नगरपंचायतमध्ये कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. सदर प्रसंगी उपनगराध्यक्ष्य सुनील ढोरे, महिला व बाल कल्याण समिती उपसभापती पूनम भोसले, महिला व बाल कल्याण समिती सदस्य वैशाली सोनवणे, स्वच्छता वैदयक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती माया अमर चव्हाण, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती गणेश सोपान म्हाळसकर, विरोधी पक्ष नेत्या अर्चना म्हाळसकर, नगरसेविका राणी म्हाळसकर, सारिका चव्हाण, आकांक्षा वाघवले, रुपाली ढोरे, नगरसेवक विशाल वहिले, अजय भवार, अनंता कुडे, पंढरीनाथ ढोरे उपस्थित होते.

वडगाव नगरपंचायतमध्ये सध्या नगराध्यक्षा, महिला व बाल कल्याण सभापती पदासह आरोग्य सभापती पद तसेच विरोधी पक्षनेते पद महिलाच भूषवित आहेत. त्यामुळे वडगाव शहारात खऱ्या अर्थाने महिलाराज असल्याचे सर्वांनी मान्य केले. स्त्री ही कुटुंबाचा पाया असते तिचे आरोग्य चांगले राहिले तर पर्यायाने संपूर्ण समाजाचे आरोग्य चांगले राहील त्यामुळे भविष्यात देखील वडगाव शहरातील स्रियांसाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा व महिला व बाल कल्याण सभापती यांनी केले.

स्त्रियांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविला असून त्याच ताकदीने ती मुलगी, माता, भगिनी, सहचारिणीची भूमिका न थकता बजावत असते त्यामुळे प्रत्येक महिला कौतुकास पात्र आहेत. त्यामुळे अशा महिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्त्रियांचा सन्मान केल्यामुळे सर्व मान्यवरांनी आनंद व्यक्त केला.

याप्रसंगी अर्चना म्हाळसकर, पूनम भोसले, माया अमर चव्हाण, आकांक्षा वाघवले, रुपाली अतुल ढोरे, अजय महेंद्र भवार यांनी मनोगत व्यक्त करून महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मनिषा चव्हाण, कार्यालय अधीक्षक, वडगाव नगरपंचायत यांनी केले. वडगाव नगरपंचायतमधील सर्व नगरसेविका, नगरसेवक आणि प्रशासन मिळून वडगाव शहरातील महिला व बालकांसाठी नक्कीच चांगले निर्णय भविष्यात घेतील असा विश्वास व्यक्त करून त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी घेतली शपथ ; राजघराण्यातील व्यक्ती, कवी – लेखक अन् राजकारणी, जाणून घ्या नवीन राज्यपालांबद्दल
– ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात ‘एस्मा’ लागू
– मोठी बातमी ! राज्यात 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती
– मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड


dainik maval jahirat

Previous Post

महाआवास अभियानअंतर्गत मावळ तालुक्याला सात पुरस्कार ; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीडीओ कुलदीप प्रधान यांनी स्वीकारले पुरस्कार

Next Post

पुणे, नागपूर सहीत ‘या’ ११ जिल्ह्यात नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

पुणे, नागपूर सहीत 'या' ११ जिल्ह्यात नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Alert issued for various districts in state heavy rain accompanied by lightning forecast for next five days

राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी ; पुढील पाच दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

August 2, 2026
Live 7-12 extracts distributed to farmers in Maval citizens benefited from Shivaji Maharaj Maharajswa Camp

मावळातील ३३७१ खातेदारांना जिवंत सातबारा वाटप ; छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा ३३२९ नागरिकांनी घेतला लाभ

August 2, 2026
Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

August 1, 2026
ahilyadevi holkar karjmukti yojna Loan waivers for 2337 farmers in Maval Taluka

मावळ तालुक्यातील 2337 शेतकऱ्यांची एकूण 11 कोटी 21 लाख रूपयांची कर्जमाफी

August 1, 2026
Inauguration of Talegaon Smart City Vision 2035 workshop in-depth brainstorming on planned development

‘तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन – २०३५’ कार्यशाळेचे उद्घाटन ; चर्चासत्रात शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सखोल विचारमंथन

August 1, 2026
rain image rain alert heavy rain

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद

July 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.