व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाआवास अभियानअंतर्गत मावळ तालुक्याला सात पुरस्कार ; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीडीओ कुलदीप प्रधान यांनी स्वीकारले पुरस्कार

उमेद अभियानांतर्गत पुणे जिल्हास्तरीय ‘मिनी सरस सावित्री जत्रे’चे आयोजन पुण्यात ऍग्रिकल्चर मैदानावर करण्यात आले आहे. या

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 11, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Maval taluka gets seven awards under Maha Awas Abhiyan

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाआवास अभियानाअंतर्गत मावळ तालुक्याला सात पुरस्कार प्राप्त झाले असून, पुण्यात आयोजित ‘मिनी सरस सावित्री जत्रे’मध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

उमेद अभियानांतर्गत पुणे जिल्हास्तरीय ‘मिनी सरस सावित्री जत्रे’चे आयोजन पुण्यात ऍग्रिकल्चर मैदानावर करण्यात आले आहे. या जत्रेचे उद्‍घाटन व पुरस्कार वितरण सोहळा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी नियुक्त सेलेब्रिटी शिवाली परब, यशदाचे उपसंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उमेदच्या प्रकल्प संचालक शालिनी कडु, उप. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, भूषण जोशी, सर्व तालुक्यातील गट विकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आदींच्या उपस्थितीत झाले. यावेळी यशवंत पंचायतराज अभियानाअंतर्गत गुणवंत कर्मचारी व आदर्श ग्रामपंचायत अधिकारी या विभागस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

महाआवास अभियानाअंतर्गत मावळ तालुक्याला सात पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यात महाआवास अभियान ग्रामीण- २ मधील २०२१-२२ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून तृतीय क्रमांकाचे मानांकन तसेच, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून कार्ला ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचे मानांकन, अमृत महाआवास अभियानमधील २०२२-२३ अंतर्गत राज्य पुरस्कृत योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून द्वितीय क्रमांकाचे मानांकन, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून महागावला द्वितीय क्रमांकाचे मानांकन व प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून कार्ला ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.

महाआवास अभियानमधील २०२३-२४ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून द्वितीय क्रमांकाचे मानांकन व राज्य पुरस्कृत आवास योजनामध्ये सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून तृतीय क्रमांकाचे मानांकन मावळ तालुक्याला प्राप्त झाले. हे सर्व पुरस्कार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, विस्तार अधिकारी शुभांगी भुमकर, प्रियांका मालपोटे व तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी घेतली शपथ ; राजघराण्यातील व्यक्ती, कवी – लेखक अन् राजकारणी, जाणून घ्या नवीन राज्यपालांबद्दल
– ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात ‘एस्मा’ लागू
– मोठी बातमी ! राज्यात 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती
– मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड


dainik maval jahirat

Previous Post

मोजणी प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी राज्यात खासगी परवानाधारक भूमापकांची नियुक्ती

Next Post

वडगाव नगरपंचायतीने आयोजित केलेल्या एकदिवसीय आरोग्य शिबिरात १८० हून अधिक महिलांचा सहभाग

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
More than 180 women participated in a one-day health camp organized by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायतीने आयोजित केलेल्या एकदिवसीय आरोग्य शिबिरात १८० हून अधिक महिलांचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Alert issued for various districts in state heavy rain accompanied by lightning forecast for next five days

राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी ; पुढील पाच दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

August 2, 2026
Live 7-12 extracts distributed to farmers in Maval citizens benefited from Shivaji Maharaj Maharajswa Camp

मावळातील ३३७१ खातेदारांना जिवंत सातबारा वाटप ; छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा ३३२९ नागरिकांनी घेतला लाभ

August 2, 2026
Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

August 1, 2026
ahilyadevi holkar karjmukti yojna Loan waivers for 2337 farmers in Maval Taluka

मावळ तालुक्यातील 2337 शेतकऱ्यांची एकूण 11 कोटी 21 लाख रूपयांची कर्जमाफी

August 1, 2026
Inauguration of Talegaon Smart City Vision 2035 workshop in-depth brainstorming on planned development

‘तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन – २०३५’ कार्यशाळेचे उद्घाटन ; चर्चासत्रात शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सखोल विचारमंथन

August 1, 2026
rain image rain alert heavy rain

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद

July 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.