व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोजणी प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी राज्यात खासगी परवानाधारक भूमापकांची नियुक्ती

खासगी परवानाधारक भूमापक व भूमापन अभिकरणांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत नियम ४७ अन्वये निवेदनाद्वारे सांगितले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 11, 2026
in महाराष्ट्र
Now you wont have to wait six months for land survey land survey cases will be settled within 30 days

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्यातील मोजणी प्रकरणांचा जलद, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण निपटारा करण्यासाठी खासगी परवानाधारक भूमापक व भूमापन अभिकरणांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत नियम ४७ अन्वये निवेदनाद्वारे सांगितले.

राज्यात गेल्या काही वर्षांत मोजणी प्रकरणांच्या आवक संख्येत सातत्याने वाढ होत आहे. पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, वनहक्क दावे, नगर व गावठाण भूमापन, संयुक्त भूसंपादन व सिमांकन यांसारख्या विविध मोजणी प्रकरणांचा वेळेत निपटारा न झाल्यास नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होतो तसेच महसूल अभिलेख अद्ययावत करण्यात विलंब होतो. विद्यमान शासकीय मनुष्यबळ मर्यादित असल्याने सर्व प्रकरणांचा विहित कालावधीत निपटारा करणे आव्हानात्मक ठरत असल्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी नमूद केले.

ही परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने मोजणीचे काम खासगी परवानाधारक भूमापकांकडून करून घेण्याची तरतूद केली आहे. १३ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या अधिसूचनेद्वारे हद्द कायम मोजणीसाठीही परवानाधारक भूमापकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

भूमि अभिलेख विभागातील प्रलंबित मोजणी प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी परवानाधारक भूमापकांची परवानाधारक अभिकरणामार्फत नियुक्ती करण्यात आली आहे. दि. ६ मार्च २०२६ रोजी २०० परवानाधारक भूमापकांच्या नियुक्तीसाठी दोन परवानाधारक अभिकरणांना कार्यारंभ आदेश देण्यात आले असल्याची माहिती मंत्री मंत्री बावनकुळे यांनी दिली.

जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून प्रत्येक जिल्ह्यात खासगी परवानाधारक भूमापकांची नियुक्ती करण्याचे नियोजन असून त्याबाबतची कार्यपद्धती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. हे परवानाधारक भूमापक दोन आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून ३० मार्च २०२६ पासून भूमि अभिलेख विभागाच्या कामासाठी उपलब्ध होणार आहेत.

या २०० परवानाधारक भूमापकांच्या मदतीने राज्यातील ज्या १७ तालुक्यांमध्ये मोजणी प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित आहेत त्या ठिकाणी प्रथम नियुक्ती करून प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

तसेच राज्यातील प्रत्येक महसूल विभागातील तीन तालुके अशा एकूण १८ तालुक्यांमध्ये पोटहिस्सा मोजणीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी पाच खासगी संस्थांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या भूमापकांचे एक आठवड्याचे प्रशिक्षण १० मार्च २०२६ पासून सुरू होत आहे.

प्रशिक्षणानंतर दोन खासगी भूमापक व भूमि अभिलेख विभागाचा एक भूमापक अशी संयुक्त टीम तयार करून निवडलेल्या १८ तालुक्यांमध्ये पोटहिस्सा मोजणी प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे, असेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

परवानाधारक भूमापकांकडून पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, वनहक्क दावे, नगर व गावठाण भूमापन, खरेदीपूर्व मोजणी, पाणंद रस्ते मोजणी आदी कामे उप अधीक्षक भूमि अभिलेख यांच्या नियंत्रणाखाली केली जाणार आहेत. मात्र शासकीय व निमशासकीय जमिनीवरील अतिक्रमण, क्षेत्र दुरुस्ती, एकत्रीकरण किंवा पुनर्मोजणी योजनांशी संबंधित मोजणी करण्यास त्यांना मनाई राहणार आहे, असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी नमूद केले.

मोजणी नकाशे, पंचनामे, डिजिटल नकाशे व अक्षांश-रेखांश तपशील ई-मोजणी प्रणालीमध्ये अपलोड केले जातील. त्यांची छाननी व प्रमाणीकरण उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयामार्फत करण्यात येईल. दोष आढळल्यास संबंधित परवानाधारक भूमापकावर फेरमोजणी, दंडात्मक अथवा शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली असल्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

या धोरणामुळे मोजणी प्रकरणांचा वेळेत निपटारा होऊन नागरिकांना जलद पारदर्शक व दर्जेदार सेवा उपलब्ध होतील तसेच महसूल अभिलेखांचे अद्यावतीकरण व संधारण आणि शासकीय यंत्रणेवरील ताण कमी होईल, महसूल मंत्री बावनकुळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी घेतली शपथ ; राजघराण्यातील व्यक्ती, कवी – लेखक अन् राजकारणी, जाणून घ्या नवीन राज्यपालांबद्दल
– ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात ‘एस्मा’ लागू
– मोठी बातमी ! राज्यात 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती
– मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अत्याधुनिक सुविधायुक्त नूतन कार्यालयाचे उद्घाटन

Next Post

महाआवास अभियानअंतर्गत मावळ तालुक्याला सात पुरस्कार ; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीडीओ कुलदीप प्रधान यांनी स्वीकारले पुरस्कार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval taluka gets seven awards under Maha Awas Abhiyan

महाआवास अभियानअंतर्गत मावळ तालुक्याला सात पुरस्कार ; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीडीओ कुलदीप प्रधान यांनी स्वीकारले पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.