तळेगाव दाभाडे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तळेगाव शहरात आज (दि. 9 मे) दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने हवेत गोळीबात केल्याची माहिती पुढे आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तळेगावातील तुकाराम नगर भागात दोन चोरटे दुचाकीवर आले होते. चोरीच्या उद्देशाने त्यांनी राघवेंद्र कुलकर्णी यांचे घर फोडले. परंतू तेव्हा तिथे उपस्थित असलेले रहिवासी शिंदे पोलिस यांनी त्यांना हटकले असता चोरट्यांनी दहशतीसाठी हवेत गोळीबार केला. ( Shooting in air by thieves who came to steal in Talegaon Dabhade Maval Crime )
चोरट्यांच्या या आकस्मिक कृत्यांना परिसरात भीती पसरली. यात कोणालाही इजा झाली नाही. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सभोवतालच्या सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु आहेत.
अधिक वाचा –
– बोटीसह 525 वाहने आणि 12 हजार अधिकारी-कर्मचारी; मावळ लोकसभेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज !
– मावळ लोकसभेतील महाविकासआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना भीमशक्ती-शिवशक्ती संघटनेचा पाठींबा जाहीर । Maval Lok Sabha
– तळेगाव दाभाडे शहरातील श्री बनेश्वर महादेव मंदिरात चंदन उटी सोहळा, कार्यक्रमाचे यंदा 24वे वर्ष, पाहा वेळापत्रक । Talegaon Dabhade