(पवनानगर प्रतिनिधी) ब्राम्हणोली येथील श्री.भैरवनाथ उत्सव व अखंड हरिनाम सप्ताहाला भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. काले येथील प्रवचनकार ह.भ.प. भाऊ महाराज कालेकर यांच्या हस्ते विणा पूजन, ज्ञानेश्वरी पूजन करुन सप्ताहाला भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. सदर अखंड हरिनाम सप्ताह शनिवार दिनांक 18 मार्च ते दिनांक 22 मार्च या कालावधीत संपन्न होणार आहे. ( Shri Bhairavnath Utsav And Akhand Harinam Saptah In Bramhanoli Village Pavan Maval _
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यादरम्यान श्री भैरवनाथ उत्सव व अखंड हरिनाम सप्ताहात खालीलप्रमाणे प्रवचनकार व किर्तनकार यांची सेवा संपन्न होणार आहे;
प्रवचनकार – ह.भ.प. भाऊ महाराज कालेकर, ह.भ.प.घनश्याम महाराज पडवळ,ह.भ.प. महादेव महाराज घारे,ह.भ.प.शंकर महाराज आडकर यांची सेवा संपन्न होणार आहे.
किर्तनकार – ह.भ.प. ॠषिकेश महाराज चोरघे, ह.भ.प. अशिष महाराज मेने,ह.भ.प. कृष्णा महाराज पडवळ,ह.भ.प.केशव महाराज मुळीक यांची किर्तनरुपी सेवा होईल.
तर बुधवार दिनांक 22 मार्च रोजी ह.भ.प.तुषार महाराज दळवी यांचे काल्याचे किर्तन संपन्न होईल. तसेच दररोज काकड आरती, हरिपाठ व पवनमावळातील विविध गावांतील जागर संपन्न होईल.
त्याचबरोबर अखेरच्या दिवशी देवाचा महाअभिषेक,आरती व पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर संध्याकाळी सोमनाथ कला पथक भंजनी भारुड सडवली यांचा भारुडाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. परिसरातील सर्व सांप्रदायिक क्षेत्रातील भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन ब्राम्हणोली ग्रामस्थ व उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– पुणे : जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन, वाचा सविस्तर । Caste Validity Certificate
– नागरी समस्या : ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडर देण्याची मागणी, नागरिकांच्या वतीने राष्ट्रवादी कामगार सेलचे एजन्सीला निवेदन