महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थान असलेले आणि कोळी, आग्री, सोनार अशा अनेक जाती-धर्मियांची कुलस्वामिनी असलेली कार्ला येथील श्री आई एकविरा देवीच्या देवस्थान ट्र्स्टची निवडणूक नुकतीच पार पडली. यात बिनविरोध झालेल्या जागा वगळता एकूण 4 जागांसाठी निवडणूक झाली, जो निकाल जाहीर झाला आहे. रविवार (दिनांक 26 फेब्रुवारी) रोजी यासाठी मतदान पार पडले होते आणि रात्री उशीरा निकाल जाहीर झाले. ( Shri Ekvira Devi Devasthan Trust Karla Lonavala Election Result 2023 )
देशमुख परिवारातील दोन पदसिद्ध जागांवर दोन देशमुख निवडून आले आहेत. गुरव देशमुख परिवारातील मारुती देशमुख हे 104 मते घेऊन निवडून आलेत, तर महेंद्र देशमुख हे 22 मते घेत विजयी झालेत. स्थानिक गावातील भाविक या दोन जागांसाठी तब्बल 21 उमेदवार रिंगणात असल्याने इथे मोठी चुरस निर्माण झाली होती. मात्र यामध्ये सागर मोहन देवकर आणि विकास काशिनाथ पडवळ यांनी अनुक्रमे 330 आणि 309 मते घेत बाजी मारली. देवस्थानच्या तीन जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या होत्या. त्यामध्ये पुजारी प्रतिनिधी म्हणून संजय गोविलकर, गुरव प्रतिनिधी म्हणून नवनाथ देशमुख आणि पदसिद्ध प्रतिनिधी म्हणून गावचे सरपंच अर्चना संदीप देवकर यांचा समावेश आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुंबई सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील एस. एच. पारच यांनी या निवडणुकीत निरीक्षक तथा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. तर गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ( Shri Ekvira Devi Devasthan Trust Karla Lonavala Election Result 2023 )
मागील 5 वर्षापूर्वी श्री एकविरा देवस्थान ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने सदरचे ट्रस्ट बरखास्त करत येथील कारभार प्रशासनाने ताब्यात घेतला होता. मात्र देवीच्या वर्षात दोन वेळा भरणार्या यात्रा आणि वर्षभर गडावर देवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांची गर्दी लक्षात घेता प्रशासन इथे लक्ष देण्यास कमी पडत असल्याने पूर्णवेळ कामकाज पाहण्यासाठी ट्रस्टची गरज लक्षात घेऊन देवस्थानच्या घटनेतील तरतुदीनुसार हि निवडणूक घेण्यात आली होती. तसेच यानंतर राज्यभरातील भाविक यांतून दोन विश्वस्त नेमण्याची प्रक्रिया देखील लवकरच पूर्ण होऊन याठिकाणी संपूर्ण विश्वस्त मंडळ निर्माण होईल.
हेही वाचा – “दुर्ग हे मावळचा खजिना… भरीव अभ्यास झाल्यास मावळातील गड किल्ल्यांमधील रहस्यमय गोष्टींचा उलगडा होईल”
सविस्तर निकाल खालीलप्रमाणे :
1) राघू त्रिंबक देशमुख व कोंडू बहिरु देशमुख तक्षिमेतील सदस्य पदाचे उमेदवारांना झालेले मतदान – 120 पैकी 115
अ) मारुती रामचंद्र देशमुख – 104 (विजयी)
ब) विजय विठ्ठल देशमुख – 10
क) अमेय विजय देशमुख – 00
2) नथू दगडू देशमुख तक्षिमेतील सदस्य पदाचे उमेदवारांना झालेले मतदान 38 पैकी 37
अ) महेंद्र अशोक देशमुख – 22 (विजयी)
ब) ऋषिकेश बाळु देशमुख – 00
क) भगवान नथू देशमुख – 14
3) स्थानिक गावातील दोन भाविक सदस्य पदाचे निवडीसाठी उमेदवारांना झालेले मतदान 1253 पैकी 1060
1) सागर मोहन देवकर 330 (विजयी)
2) विकास काशिनाथ पडवळ – 309 (विजयी)
3) सोमनाथ रामभाऊ बोत्रे – 145
4) युवराज शंकर पडवळ – 257
5) श्रीमती रेशमा युवराज पडवळ – 25
6) शरद वसंत कुटे – 9
7) संजय भागोजी देवकर – 6
8) मंगेश विठ्ठल देशमुख – 126
9) चंद्रकांत हावजी देवकर – 288
10) निलेश साहदू बोरकर – 8
11) संजय भागुजी देवकर – 3
12) अशोक वसंत कुटे – 196
13) विनोद मोहन देवकर – 3
14) निरंजन प्रदिप बोत्रे – 34
15) मारुती राजाराम देवकर – 79
16) आकाश बबन माने – 0
17) सुनिल हुकाजी गायकवाड – 125
18) मिलींद दत्तात्रेय बोत्रे – 1
19) मनोहर सदाशीव पडवळ – 9
20) मधूकर राघु पडवळ – 2
21) अनिकेत दशरथ देशमुख – 1
अधिक वाचा –
– माजी आमदार स्व. दिगंबर दादा भेगडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ रविंद्र भेगडेंकडून दिवड येथील शाळेच्या इमारतीसाठी मोलाची मदत
– लोणावळा शहरातील रिदम हॉटेलसमोर मध्यरात्री झालेल्या अपघातात दोन अनोळखी दुचाकीस्वारांचा मृत्यू