वडगाव नगरवासियांचे ग्रामदैवत असलेल्या श्री पोटोबा महाराज देवस्थान उत्सव समिती 2023 च्या अध्यक्षपदी संजय सजन दंडेल यांची निवड झाली आहे. सोमावारी (दिनांक 20 मार्च) रोजी पोटोबा मंदिरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंदिराचे विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. ( Shri Potoba Maharaj Devasthan Utsav Samiti Committee 2023 Vadgaon Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
श्री पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर आणि विश्वस्त यांच्या बैठकीत अध्यक्षासह इतरही निवडी करण्यात आल्या.
उत्सव कमिटी खालीलप्रमाणे;
अध्यक्षपदी संजय दंडेल, कार्याध्यक्षपदी सचिन कराळे, शिवाजी येळवंडे, कार्यक्रम प्रमुख बाळासाहेब तुमकर, उपाध्यक्षपदी अनिकेत भगत, अक्षय रौंधळ, खंडू जाधव, केदार बवरे, समिर ढोरे, सचिव संतोष ढमाले, सहसचिव सोमनाथ धोंगडे, खजिनदार अनिल कोद्रे सहखजिनदार सुधीर ढोरे, प्रसिद्धी प्रमुख सुहास विनोदे, गुलाब म्हाळसकर आदींची निवड झाली.
यावेळी मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, उपाध्यक्ष गणेश आप्पा ढोरे, सचिव अनंता कुडे, खजिनदार चंद्रकांत ढोरे, विश्वस्त सुभाष जाधव, तुकाराम ढोरे, किरण भिलारे, अरुण चव्हाण, ऍड अशोक ढमाले, ऍड तुकाराम काटे, सुनीता कुडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यात 187 गावांत राबवणार जलयुक्त शिवार अभियान 2.0, मावळ तालुक्यातील ‘या’ 13 गावांचा समावेश
– वर्धापन दिन सोहळ्यात ‘वारकरी सांप्रदाय मावळ रत्न पुरस्कार’ प्रदान