Dainik Maval News : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत हिंजवडी ताथवडे गटातून सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांनी दणदणीत विजय प्राप्त केला आहे. या गटातून तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी पॅनलचे विदुरा उर्फ नानासाहेब नवले, चेतन भुजबळ, दत्तात्रय जाधव विजयी झाले आहे. तर, अपक्ष उमेदवार बाळासाहेब भिंताडे पराभूत झाले आहेत.
कारखान्याच्या एकूण 21 संचालकांच्या मंडळासाठी पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी 18 जागा या पूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. परंतु हिंजवडी ताथवडे गटात चार उमेदवार रिंगणात राहिल्याने मतदान झाले. शनिवारी, मतदान झाल्यानंतर रविवारी मतमोजणी पूर्ण झाली. यामध्ये सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलचे तिन्ही उमेदवार विदुरा नवले, चेतन भुजबळ आणि दत्तात्रय जाधव विजयी झाले. ( Shri Sant Tukaram Sugar Factory Election Nanasaheb Navale Chetan Bhujbal Dattatray Jadhav Win )
उमेदवारांना मिळालेली मते ;
नानासाहेब नवले – 8524 मते
दत्तात्रय जाधव – 8380 मते
चेतन भुजबळ – 7189 मते
अपक्ष बाळासाहेब भिंताडे – 2505 मते
एकूण वैध मतपत्रिकांची संख्या – 9515
अवैध मतांची संख्या – 112
यापूर्वीच बिनविरोध विजयी झालेले संचालक (एकूण १८)
ऊस उत्पादक गट क्र. २ (पौड-पिरंगुट)
1. ढमाले धैर्यशील रमेशचंद्र (बेलावडे, ता. मुळशी)
2. गायकवाड यशवंत सत्तू (नाणेगाव, पो. कुळे, ता. मुळशी)
3. उभे दत्तात्रय शंकर (कोळावडे, ता. मुळशी)
ऊस उत्पादक गट क्र. ३ (तळेगाव-वडगाव)
4. दाभाडे ज्ञानेश्वर सावळेराम (माळवाडी, पो. इंदोरी, ता. मावळ)
5. भेगडे बापूसाहेब जयवंतराव (तळेगाव दाभाडे, ता. मावळ)
6. काशिद संदीप ज्ञानेश्वर (इंदोरी, ता. मावळ)
ऊस उत्पादक गट क्र. ४ (सोमाटणे-पवनानगर)
7. कडू छबुराव रामचंद्र (पाचाणे, पो. चांदखेड, ता. मावळ)
8. लिम्हण भरत मच्छिंद्र (सांगवडे, पो. साळुंब्रे, ता. मावळ)
9. बोडके उमेश बाळू उर्फ बाळासाहेब (गहुंजे, पो. देहूरोड, ता. मुळशी)
ऊस उत्पादक गट क्र. ५ (खेड-शिरूर-हवेली)
10. लोखंडे अनिल किसन (मरकळ, ता. खेड)
11. भोंडवे धोंडिबा तुकाराम (शिंदे वस्ती, रावेत, ता. हवेली)
12. कोतोरे विलास रामचंद्र (चिंबळी, ता. खेड)
13. काळजे अतुल अरुण (काळजेवाडी, चऱ्होली बुद्रुक, ता. हवेली)
महिला राखीव
14. अरगडे ज्योती केशव (काळुस, ता. खेड)
15. वाघोले शोभा गोरक्षनाथ (दारुंब्रे, पो. साळुंब्रे, ता. मावळ)
अनुसूचित जाती-जमाती
16. भालेराव लक्ष्मण शंकर (काले, पो. पवनानगर, ता. मावळ)
इतर मागासवर्ग
17. कुदळे राजेंद्र महादेव (सुभाषनगर, शुक्रवार पेठ, पुणे)
विमुक्त जाती/भटक्या जमाती
18. कोळेकर शिवाजी हरिभाऊ (कोयाळी तर्फे चाकण, ता. खेड)
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number