उद्योगमंत्री उदय सामंत ( Shiv Sena leader Uday Samant ) हे चिंचवड (Chinchwad) येथे एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मावळ लोकसभा (Maval Loksabha) निवडणूकीबद्दल आणि खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barne) यांच्या उमेदवारीबद्दल भाष्य केले. खासदार श्रीरंग बारणे यांच्यासारखी व्यक्ती खासदार होणे ही काळाची गरज आहे. दीड महिन्यानंतर श्रीरंग बारणे हे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने खासदार झालेले दिसतील, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
सकाळ तर्फे बारणे यांच्यावर कॉफिटेबल बूक तयार करण्यात आले. त्याचे प्रकाशन मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कोहिनुर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, खासदार श्रीरंग बारणे, भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद उपस्थित होते. ( Shrirang Barane will once again become MP for Maval Lok Sabha Constituency Said Uday Samant )
मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून कोण उमेदवार असणार यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भाष्य करत पुढील दीड महिन्यात श्रीरंग बारणे हेच खासदार असतील असे विधान केले आहे. त्यामुळे श्रीरंग बारणे हेच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असण्याची शक्यता वाढली आहे.
सामंत म्हणाले, पवना, इंद्रायणी या नद्यांच्या प्रदुषणाबद्दल बारणे यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेत. यापूर्वी अनेकजण येऊन गेले त्यांचा दृष्टीकोन काय होता माहित नाही, पण बारणे यांनी त्यासाठी सतत पाठपुरावा केला. चार महिन्यांपूर्वीच या विषयावर महापालिकेत बैठक घेतली. आम्ही या प्रकल्पासाठी तीन वर्षांत दोन हजार कोटी रुपये खर्च करतोय. आता त्या कामाचा डीपीआर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी त्याचे टेंडर होईल, अशी ग्वाही मंत्री सामंत यांनी यावेळी दिली.
सकाळ समूहाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या माझ्या “संसदरत्न श्रीरंग आप्पा” या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यातील काही क्षणचित्रं !#Shivsena #shrirangappabarne #pimprichinchwad #mavalloksabha #maval #panvel #uran #karjat #khalapur #शिवसेना #सांसद pic.twitter.com/yVi26E8rbe
— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) March 14, 2024
अधिक वाचा –
– आरपीआय आठवले गटाचे सूर्यकांत वाघमारे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड । Pune District Planning Committee
– मराठा समाजही मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढणार! प्रत्येक गावातून असणार ‘इतके’ उमेदवार । Maval Lok Sabha Election 2024
– राज्यातील आशा स्वयंसेविकांना शासनाकडून मोठ्ठं गिफ्ट, मानधनात तब्बल 5 हजार रुपयांची वाढ