व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राज्यातील आशा स्वयंसेविकांना शासनाकडून मोठ्ठं गिफ्ट, मानधनात तब्बल 5 हजार रुपयांची वाढ

राज्यातील आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या नि‍धीतून दिल्या जाणाऱ्या 5 हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 14, 2024
in महाराष्ट्र
Maharashtra-Asha-Volunteer

Photo Courtesy : Team Dainik Maval


राज्यातील आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या नि‍धीतून दिल्या जाणाऱ्या 5 हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थे अंतर्गत कार्यरत असलेल्या सुमारे 80 हजार 85 आशा स्वयंसेविकांना या निर्णयामुळे लाभ होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

आशा स्वयंसेविकांच्या मानधन वाढीसाठी आरोग्य मंत्री डॉ. सावंत आग्रही होते. त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आंदोलनकर्त्या आशा स्वयंसेविकांशी नेहमी सकारात्मक चर्चा करून त्यांचे समाधान केले. आजच्या निर्णयामुळे आरोग्य मंत्री यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून आशा स्वयंसेविकांना लाभ मिळाला आहे. मानधनातील ही वाढ नोव्हेंबर, 2023 या महिन्यापासून देण्यात येईल. 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली 200.21 कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच 961.08 कोटीच्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आली. ( Maharashtra Asha Volunteer Salary increased by Rs 5 thousand )

  • मानधन वाढीच्या निर्णयामुळे महाराष्ट्र हे आशा स्वयंसेविकांना सर्वाधिक मानधन देणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राज्यात सन 2007 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. सद्यस्थितीत राज्यात 80 हजार 85 आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. या पूर्वी आशा स्वयंसेविकेस 5 हजार रुपये मानधन देण्यात येत होते. त्यांना केंद्र शासन स्तरावरूनही 3 हजार रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे या निर्णयानंतर आशा स्वयंसेविकांना आता 13 हजार रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे.

आशा स्वयंसेविकांच्या बऱ्याच दिवसांपासून मानधन वाढीची मागणी होती. त्यासाठी संपही पुकारण्यात आला होता. संपाच्या अनुषंगाने विविध संघटनांचे प्रतिनिधी याचे सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री डॉ. सावंत, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्यसेवा आयुक्त धीरजकुमार, सहसंचालक सुभाष बोरकर यांनी चर्चा केली होती. त्यानुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मानधनवाढीस मान्यता दिली आहे.

अधिक वाचा –
– भाजपाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर! पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांना तिकीट; पंकजा मुंडे, मुनगंटीवार यांनाही उमेदवारी
– कामशेतमध्ये शनिवारी ‘सौ-भाग्यवती मावळ’ कार्यक्रम, दुचाकी आणि सोन्यांच्या नाण्यांसह भरघोस बक्षिसे, वाचा सविस्तर
– पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ, अहमदनगरचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’, शिंदे सरकारचे एकापेक्षा एक मोठे निर्णय


dainik maval jahirat

Previous Post

विशेष बातमी! …अन् मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी बदलली

Next Post

मराठा समाजही मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढणार! प्रत्येक गावातून असणार ‘इतके’ उमेदवार । Maval Lok Sabha Election 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sakal-Maratha-Samaj-Maval

मराठा समाजही मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढणार! प्रत्येक गावातून असणार 'इतके' उमेदवार । Maval Lok Sabha Election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.