Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे शहरातील माऊंट सेन्ट ॲन हायस्कूलमधील विद्यार्थी श्रीरूप जगताप याने नुकत्याच झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सीबीएससी आयसीएससी विभागात महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक संपादन केला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम तीन क्रमांकांपैकी द्वितीय क्रमांक मिळवत श्रीरूपने मावळच्या शैक्षणिक नावलौकिकात भर टाकली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शिष्यवृत्ती परीक्षा ही स्पर्धा परीक्षेचा पाया समजली जाते. या परीक्षेतील प्रश्नांची रचना अतिशय क्लिष्ट व विचार करायला लावणारी असते. या परीक्षेमध्ये वेळेचे नियोजन अतिशय महत्त्वाचे असते. श्रीरूपला तळेगाव येथील उत्कर्ष प्रबोधिनीचे विपुलकुमार भुसारे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षकांचे मार्गदर्शन, अभ्यासातील सातत्य, संयम व चिकाटी यामुळे हे सुयश प्राप्त झाले असे श्रीरूप याने सांगितले. श्रीरूप हा पुणे जिल्हा परिषदेने गौरवलेले मा. मुख्याध्यापक कै. जनार्दन माळी सर यांचा नातू असून कडधे शाळेतील आदर्श शिक्षिका श्रीमती प्रज्ञा माळी यांचा सुपुत्र आहे. ( Shrirup Jagtap student from Talegaon Dabhade stood second in state in Scholarship Examination )
श्रीरुपच्या या कौतुकास्पद यशाबद्दल मावळचे आमदार सुनिल शेळके, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अशोक शेलार, अमरदेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहूमामा शेलार, मा. उपाध्यक्ष पोपटराव भेगडे, शिक्षक नेते राजू भेगडे, खजिनदार सुहास माळी, युवा नेते योगेश माळी यांनी अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक संपादन करत मावळच्या नावलौकिकात भर टाकल्याबद्दल शिक्षण क्षेत्रातील अनेक मंडळींनी त्याचे कौतुक केले आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! पुणे जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळ परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू, मावळ तालुक्यातील ‘या’ ठिकाणांचा समावेश
– राज्यात शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम पीक स्पर्धेचे आयोजन, जाणून घ्या माहिती
– ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी तब्बल 46 हजार कोटींची तरतूद ; अर्ज प्रक्रियेत महिलांची अडवणूक खपवून घेणार नाही