महाराष्ट्र शासन – कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील भोयरे गावात रेशीम उद्योग तंत्रज्ञान ( silk Industry Technology ) विषयावर कौशल्य आधारित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे ( Skill Based Training Workshop ) आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत कार्यालय भोयरे (ता मावळ) ( Bhoyre Village Maval ) येथे दिनांक 22 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबर 2022 अशी दोन दिवस ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पी. जी. शिरसाट (जिल्हा रेशीम अधिकारी, पुणे), दत्तात्रय गावडे (विषय विशेषज्ञ ,कृषि विज्ञान केंद्र,नारायणगाव), दत्तात्रय पडवळ (तालुका कृषि अधिकारी, मावळ) आणि आर.पी.गायकवाड (मंडळ कृषि अधिकारी, वडगाव) हे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यासह मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक आणि आत्मा मावळचे राहुल घोगरे आणि परिसरातील बहुसंख्य शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित होते. ( Skill Based Training Workshop On silk Industry Technology At Bhoyre Village Maval )
अधिक वाचा –
मावळ तालुक्यात पसरतोय हा भयंकर आजार, शेतकरी प्रचंड चिंतेत, उर्से गावात कहर
लम्फी स्कीन : वेहेरगाव दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीकडून पशूधनाचे मोफत लसीकरण