महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल (HSC Exam 2024 Result) आज (दि. 21 मे) जाहीर करण्यात आला. मावळ तालुक्यातील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे कार्ला येथील श्री एकविरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स विद्यालयाचा यंदा 94.11 टक्के निकाल लागला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवत संस्था आणि विद्यालयाचे नाव गाजवले आहे. यंदा बारावी बोर्ड परिक्षेत करिना गोपीनाथ देवकर हि विद्यार्थीनी 81.17 टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम आली आहे. तर पायल राजेश देवकर हिचा 78.33 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक आला आहे. तिसरा क्रमांक सिध्दी पोपट ठाकर हिचा आला असून तिला 77.17 टक्के गुण मिळाले आहेत.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, संस्थेचे सचिव संतोष खांडगे, शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे, सह सचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के, कॉलेजचे प्राचार्य संजय वंजारे, सरपंच दिपाली हुलावळे, उपसरपंच किरण हुलावळे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच, प्राध्यापिका, वर्गशिक्षिका, काजल गायकवाड, सचिन हुलावळे, अनिल चौधरी यांनी विद्यालयातील बारावीच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. ( Smt Lajwanti Hansraj Gupta Junior College of Commerce Karla result of HSC 12th board exam year 2024 )
मावळचा निकाल –
बारावी निकालाबाबत मावळ तालुक्याची आकडेवारी देखील समोर आली आहे. मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल 93.72 टक्के इतका लागला आहे. मावळ तालुक्यातील 4065 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 3791 विद्यार्थी पास झाले आहेत. 299 विद्यार्थी डिस्टिंक्सनमध्ये आले असून 993 विद्यार्थी प्रथम श्रेणी मिळवून पास झाले आहेत.
राज्याचा निकाल –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल (HSC Exam 2024 Result) आज (दि. 21 मे) जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा इयत्ता बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. यात सर्वाधिक 97.51 टक्के निकाल कोकण विभागाचा, तर सर्वाधिक कमी 91.95 टक्के निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.
अधिक वाचा –
– बारावीचा निकाल चेक करण्यासाठी लिंक, तुमच्याकडे इंटरनेट नसेल तरीही चेक करता येईल रिझल्ट, जाणून घ्या सोपी पद्धत । HSC Result 2024
– बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचाच डंका ! कोकण विभाग पुन्हा अव्वल, वाचा निकाल सविस्तर । HSC Exam2024
– महावितरणचा गलथान कारभार, मावळ तालुक्याचे मुख्यालय वडगाव शहरात तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव ! Vadgaon Maval