वनपरिक्षेत्र शिरोता अंतर्गत असणारे मौजे वेहेरगाव कार्ला इथे श्री एकविरा देवी दर्शनासाठी आणि जगप्रसिद्ध कार्ला लेणी पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त व पर्यटक येत असतात. त्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून श्री एकविरा देवी आणि कार्ला लेणी परिसरात वन विभागातर्फे सौर दिवे व सौर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या उपक्रमामुळे हा संपूर्ण परिसर प्रकाशमय व सीसीटीव्ही कॅमेराच्या अंतर्गत आल्याने सुरक्षित झाला आहे. तसेच येणाऱ्या भक्त भाविकांच्या सोयीसाठी जागोजागी बसण्यासाठी बेंचेस देखिल बसवण्यात आले आहेत. हे काम मुख्यवनसंरक्षक एन.आर. प्रविण सर, उपवनसंरक्षक पुणे राहुल पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक मयुर बोठे, वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता सुशिल मंतावार यांच्या नेतृत्वाखाली युद्ध पातळीवर करण्यात आले. ( solar lights and CCTV cameras were installed in vehergaon karla areas by forest department )
त्या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार, वनपरीमंडळ अधिकारी कार्ला प्रमोद रासकर तसेच वनरक्षक गणेश धुळशेटे उपस्थित होते. तसेच परिसरात प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी वनविभागा मार्फत बाॅटल क्रशर लवकरच बसवण्यात येणार असल्याचे सांगितले. सदर उपक्रमाचे गावकऱ्यांनी व भाविकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
अधिक वाचा –
– ‘भटकंती सह्याद्रीची सामाजिक प्रतिष्ठान मावळ’चा चौथा वर्धापन दिन दुर्ग इंदोरी इथे उत्साहात साजरा
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताचा थरार..! ब्रेक फेल ट्रकची सहा वाहनांना धडक, अनेकजण जखमी, 1 ठार