Dainik Maval News : स्व. प्रभाकरराव मालपोटे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित टाकवे येथील पतसंस्थेची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. संस्थेचे संस्थापक नारायण मालपोटे व अध्यक्ष विलास मालपोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित संचालक मंडळामधून अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार यांची निवड करण्यात आली.
यामध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी टाकवे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सोमनाथ शांताराम आसवले, तर उपाध्यक्षपदी आबंळे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नवनाथ नंदू मोढवे यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी आदिनाथ दगडू आगळमे, तसेच खजिनदारपदी विश्वास महादू मालपोटे यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे संचालक दादाभाऊ गबाजी ओव्हाळ, संचालिका चंद्र रेखा सुदाम जाधव, संचालिका कमल प्रभाकर मालपोटे, संचालिका सुशीला गोरख मालपोटे, संस्थेचे ऑडिटर हरिश्चंद्र महामुनी व्यवस्थापक विनोद मालपोटे तसेच संस्थेचे कर्मचारी प्रिया पवार , सुनिता निदान आदीजण उपस्थितीत होते.
आगामी काळात पतसंस्थेत जोडले गेलेल्या सभासदांना सोबत घेऊन पतसंस्थेचा आर्थिक पाया अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सोमनाथ असवले यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनासाठी वडगावकर नागरिकांना देशी झाडांच्या ७००० रोपांचे मोफत वाटप । Vadgaon Maval
– राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती ; ‘जिल्हा नियोजन’मधून ४५८ कोटी रुपयांची तरतूद
– आंदर मावळ विभागासाठी महिला व बालस्नेही फिरत्या बसचे लोकार्पण ; ३३ गावांना होणार फायदा