Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग ह्या विभागातून उत्तीर्ण झालेल्या सोनल खांदवे – शिंदे यांची राज्यसेवा २०२३ परीक्षेमधून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (वर्ग १) पदी निवड झाली आहे.
सोनल यांची यापूर्वी महाराष्ट्रात तिसऱ्या आणि मुलींमध्ये प्रथम क्रमांकाने सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर निवड झाली होती. सध्या त्या मंत्रालयात औषधी द्रव्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे माजी विद्यार्थी, आदिवासी प्रकल्प अधिकारी आकाश दिलीप शिंदे यांच्या पत्नी आहेत.
सोनल यांचे यश हे अथक परिश्रमाचे फळ असून संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य डॉ. एस. एन. सपली आदी मान्यवरांनी सोनल यांचे अभिनंदन केले आहे.
अधिक वाचा –
– मावळ मनसेत पडणार खिंडार? माजी तालुकाध्यक्ष शरद पवारांच्या पक्षात जाणार? नेत्यांच्या भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण । Maval News
– मावळमध्ये काँग्रेसला मोठा झटका ! युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षाने सोडला ‘हात’, शिवसेनेला देणार साथ । Maval News
– लोणावळ्यात शिवसेना उबाठा पक्षाला खिंडार ! अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत पक्षप्रवेश
– मुंबई-पुणे प्रवास होणार सुखकर ! राज्य सरकारचा महत्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अंतिम टप्प्यात । Mumbai Pune Missing Link