Dainik Maval News : वडेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेच्या पदवीधर शिक्षिका वनिता राजपूत यांचा पंचायत समिती मावळच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या इयत्ता सहावीच्या पत्रलेखन या उपक्रमाची दखल घेत विनोबा ॲप च्या ‘पोस्ट ऑफ द मंथ’ या सन्मानासाठी त्यांची निवड झाली आहे. पंचायत समिती वडगाव मावळ येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, शिक्षण विस्तार अधिकारी शोभा वहिले, वडेश्वर केंद्राचे केंद्रप्रमुख रघुनाथ मोरमारे, विनोबा ॲपचे रोहित गारोले इ. मान्यवर उपस्थित होते.
वनिता राजपूत या वडेश्वर येथील उपक्रमशील शिक्षिका असून विविध प्रशिक्षणांमध्ये त्या सुलभक म्हणून उत्तम भूमिका बजावत असतात. वडेश्वर केंद्रातील ‘टॅग’ या उपक्रमाच्या त्या समन्वयक असून विद्यार्थी इंग्रजी भाषेत निपुण व्हावेत यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. यापूर्वी त्यांना पंचायत समिती मावळचा गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाला असून विनोबा ॲपच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या या पुरस्काराबद्दल आंदर मावळातून त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– औंढे गावातील आदर्श शिक्षिका शांता मंडले यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार
– साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड, पवनानगर येथे अल्प दरात साखरेचे वाटप । Pavananagar News
– तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील शासकीय संपत्तीवरील पोस्टर, बॅनर हटविण्याचे आवाहन । Talegaon Dabhade