Dainik Maval News : सोमाटणे फाटा (ता. मावळ ) येथे मंगळवारी (दि.१०) रात्री झालेल्या दुचाकी आणि कंटेनर अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर तरुणी गंभीर जखमी आहे. एस. के. मनिरुल (वय. २२, रा. तळेगाव, मुळगाव हावडा, पश्चिम बंगाल) असे मृत तरुणाचे नाव असून प्राची सोरटे (वय २० रा. शिरगाव) असे जखमी तरुणीचे नाव आहे.
मनिरुल व सोरटे दुचाकीवरून पुणे-मुंबई महामार्गाने तळेगावकडून सोमाटणेकडे जात असताना पाठीमागून आलेल्या कंटेनरने त्यांना धडक दिली. या अपघातात मनिरुल याचा जागीच मृत्यू झाला तर प्राची जखमी आहे. तिला उपचारासाठी सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर कंटेनर चालक फरार असून तळेगाव पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– राज्यात लवकरच ७० हजार पदांची नोकरभरती, नव्या पद्धतीने होणार भरती ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– महाशिवरात्रीसाठी श्री भीमाशंकर मंदिर बंद राहणार ; भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकासकामे वेगात सुरू
– लोणावळ्यात नाश्त्यासाठी थांबला अन् फेरफटका मारायला गेला.. प्रसिद्ध कलाकाराच्या एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू
– मार्केटयार्ड (पुणे) ते शिळींब (ता. मावळ) पीएमपीएमएल बससेवेचा प्रारंभ ; स्थानिकांच्या मागणीला आणि आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

