Dainik Maval News : मावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव हायवा ट्रक ने दुचाकीला धडक दिली यात दुचाकीस्वार तरूण चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दीपक साई असे अपघातात मृत्यू पावलेल्या 28 वर्षीय तरूणाचे नाव आहे.
देहूरोड परिसरातील साई द्वारका सोसायटीसमोर ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अपघाताच्या कित्येक वेळानंतर तरूणाचा मृतदेह रस्त्यात पडला होता. त्यामुळे देहूरोड पोलिसांच्या निष्काळजीपणाबद्दल परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय.
प्राप्त माहितीनुसार सीसीटीव्ही फुटेज पाहता दुचारीस्वार दुचाकी घेऊन चालला होता. इतक्यात मागून येणाऱ्या भरधाव हायवा ट्रकने थेट दुचाकीस्वाराला चिरडलं. अपघातात दीपक साई याचा जागीच मृत्यू झाला होता. हा तरूण नेपाळी होता आणि काही कामानिमित्त घराबाहेर पडला होता, यावेळी त्याला मृत्यूने गाठलं.
दरम्यान हायवेवर सुरू असलेल्या विकासकामांमुळे वाहने सर्व्हिस रोडकडे वळवली जातात आणि याच रस्त्यावरून शाळांची वाहतूक तसेच रहिवाशांची ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत भरधाव ट्रक म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘आयुष्मान भारत गोल्ड कार्ड’ तयार करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन – जाणून घ्या योजनेबद्दल
– गणेशोत्सवातून तरूणाईची होणारी एकजूट सामाजिक विकासासाठी गरजेची – एसीपी विकास कुंभार
– देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक ; आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाला ठोस निर्देश