Dainik Maval News : चाकण – तळेगाव मार्गावर पुन्हा एकदा भरधाव वेगातील अवजड वाहनामुळे सामान्य नागरिकाचा बळी गेला आहे. एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली व या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मंगळवार (दि.४) रोजी पहाटे सहाच्या सुमारास चाकण-तळेगाव रोडवर बदलवाडी चौक येथे हा अपघात घडला. नितीन संपतगार गोटे (वय २६, रा. वाकी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी केतन निवृत्तीकड पाटील (वय ४६, रा. वाकी, ता. खेड) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी, विठ्ठल बाबुराव मोरे (वय ४६, रा. हडपसर, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी केतन यांचा मामे भाऊ नितीन गोटे हे दुचाकीवरून चाकण-तळेगाव रोडने जात होते. त्यावेळी बदलवाडी चौकात आल्यानंतर समोरून आलेल्या ट्रकने नितीन यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात नितीन गंभीर जखमी झाला, त्यातच त्याचा मृत्यू झाला. तळेगाव एमआयडीसी अधिक पोलीस तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अभ्यासिकेत अभ्यास केलेले चार विद्यार्थी बनले अधिकारी ; मुख्याधिकाऱ्यांनी केला सन्मान । Talegaon Dabhade
– देहू नगरपंचायतीला यात्रा अनुदान कधी मिळणार? नागरिकांच्या मिळकत करातून होतोय कोट्यवधीचा खर्च । Dehu News
– पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षणाची मागणी ; मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन