Dainik Maval News : लोणावळा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, भाजपा, शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, लोक जनशक्ती पक्ष या महायुतीचे मावळ विधानसभेचे अधिकृत उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्या वॉर्ड निहाय प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत आहे. राम कृष्ण हरी.. आपलं विकासाचं घड्याळच लय भारी… अशा भावना लोणावळाकर नागरिक या प्रचाराच्या निमित्त देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून मागील पंचवार्षिक काळामध्ये लोणावळा शहरांमधील अत्यंत जिव्हाळीचा विषय असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम झाले आहे. मागील 15 ते 20 वर्षापासून लोणावळे कर नागरिक या रुग्णालयाची मागणी करत होते मात्र कोणीही या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिले नव्हते. येत्या काळात या रुग्णालयामध्ये लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण परिसरामधील सर्व नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत.
लोणावळा शहरांमधील दुसरा अत्यंत ज्वलंत विषय असलेल्या भांगरवाडी उड्डाणपुलाचे काम मागील सहा ते सात वर्षापासून रखडले आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय व वाहतूक कोंडीचा मनस्ताप सोडवण्यासाठी पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबत बैठक करत या उड्डाण पुलाच्या कामाला गती देण्यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी आमदार सुनील शेळके यांनी मंजूर करून घेतला आहे. पुढील काळामध्ये हे काम पूर्ण करत लोणावळाकर नागरिकांना दिलासा देण्याचा शब्द त्यांनी या निवडणुकीच्या माध्यमातून दिला आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम मागील सात ते आठ वर्षापासून रखडले होते. लोणावळा नगर परिषदेने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. या कामाला देखील साडेतीन कोटी रुपयांचा निधी देत आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून सर्व तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेत या कामाला प्रत्येक सुरुवात झाली आहे. यासह लोणावळा शहरातील विविध विकास कामांसाठी आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून निधी देण्यात आला आहे.
लोणावळा शहर व संपूर्ण मावळ तालुक्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक हा साडेतीनशे कोटी रुपयांचा प्रकल्प आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून लायन्स पॉईंट या ठिकाणी आला आहे. आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून मावळ तालुका, लोणावळा शहर व ग्रामीण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असल्याने यंदा नागरिकांनी आमचं ठरलं आहे.. राम कृष्ण हरी.. आपलं विकासाच घड्याळच लय भारी… अशा घोषणा नागरिक देत असून आमदार सुनील शेळके यांना पुन्हा एकदा आमदार करण्यासाठी लोणावळाकर जनता सज्ज झाली असल्याचे चित्र या प्रचार दौऱ्यांमधून मिळत असलेल्या प्रतिसादातून स्पष्ट दिसत आहे.
आई एकवीरा देवीचे मंदिर व परिसराचा पर्यटन विकास आराखड्याच्या माध्यमातून सुरू असलेला विकास. कार्ला, मळवली दरम्यान असलेल्या इंद्रायणी नदीवर अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात आलेला पूल. अशा विविध प्रकारची विकास कामे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून सुरू आहेत. याच विकास कामांना पाठबळ देण्यासाठी मावळची जनता आमदार सुनील शेळके यांच्या विजयासाठी सज्ज झाली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सुनीलअण्णा तू एकटा नाही, मावळातील समस्त मातृशक्ती सदैव तुझ्या पाठीशी – रुपाली चाकणकर
– मावळात धक्कादायक प्रकार ; अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांनी महिला पत्रकाराला धमकावले, चार जणांविरोधात गुन्हा दाखल
– मतदारांनो… मतदान कार्डासह मतदानासाठी ‘हे’ 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावा म्हणून वापरता येणार – पाहा यादी