एसआरटी अर्थात सगुणा राइस तंत्र या पद्धतीने भातशेती करण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत सदर पद्धतीचा योग्यरित्या प्रचार करणारे पवनमावळ भागातील कृषी सहाय्यक विकास गोसावी यांना ‘स्टार प्रचारक अधिकारी’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील नेरळ इथे एसआरटी शेतकरी कृषी सन्मान सोहळा 2023 याचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 22 मे रोजी झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात विकास गोसावी यांना सन्मानित करण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राज्यातील विविध जिल्ह्यात भाताची वेगवेगळ्या पद्धतीने लागवड करण्यात येते. परंतू एसआरटी अर्थात सगुणा राइस तंत्रज्ञान ही भात लागवडीची आधुनिक आणि सर्वात फायदेशीर पद्धत असल्याचे आता सिद्ध होत आहे. ‘एसआरटी’ पद्धतीत नांगरणी, चिखलणी आणि लावणी न करता गादी वाफ्यांवर टोकपणी करून लागवड केली जाते. ज्यामुळे शेतकऱ्यांचे श्रम आणि पैसा वाचतोच पंरतू उत्पन्नही वाढण्यास मदत होते. ज्यामुळे जमिनीची धूप होण्याचे प्रमाण कमी होते. याशिवाय जमिनीचा कर्ब वाढतो आणि उत्पादकताही वाढते.
“पवनमावळ भागातील बहुतांश शेतकरी हे पारंपारिक पद्धतीने भात लागवड करतात. परंतू, कृषी सहाय्यक विकास गोसावी आणि त्यांच्या टीमने गावोगावी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना एसआरटी तंत्रज्ञानाचे महत्व पटवून दिले. तसेच त्यांची प्रात्याक्षिके घेतली. यातूनच पवन मावळात सद्यमितीला 90 ते 100 हेक्टरवर एसआरटी पद्धतीने भातलागवड होताना दिसत आहे.”
“एसआरटी भात लागवडीचा आतापर्यंत प्रामाणिकरित्या प्रचार प्रसार केला. या कामाची दखल घेत सगुणा बाग नेरळ, रायगड यांच्या वतीने राज्यस्तरीय “स्टार प्रचारक अधिकारी “हा पुरस्कार मला देण्यात आला. याचे श्रेय शेतकरी मित्रांचे आहे, त्यामुळेच हा सन्मान मिळू शकला.” अशी प्रतिक्रिया विकास गोसावी यांनी दैनिक मावळला दिली. ( star pracharak adhikari award to agriculture assistant vikas gosavi who introduced SRT technology in pavan maval )
अधिक वाचा –
– पालखी सोहळ्याची पुणे जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी; पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या सुविधा पुरविण्यावर विशेष भर
– विद्यार्थी आणि पालकांसाठी आनंदाची बातमी, दप्तराचे ओझे होणार कमी, शिक्षणमंत्र्यांनी दिल्या सुचना, वाचा