मावळ तालुक्यातील प्रथम डान्स टीचर असणारे राहुल देठे यांना मनुष्यबळ सेवा विकास अकादमी (रजि. ट्रस्ट) मुंबई तर्फे महाराष्ट्र राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. राहुल देठे यांनी कोरोना काळात रुग्णांना ऑक्सिजनची टंचाई भासत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना एरोबिक्स व्यायाम प्रकार शिकवून त्यांची इम्युनिटी वाढवली आणि ते कामही विनामूल्य केले होते. ( State Level Teacher Ratna Award to Dance Teacher Rahul Dethe from Maval Taluka )
मागील बऱ्याच वर्षांपासून राहुल देठे हे त्यांच्या अकॅडमीमध्ये गरीब विद्यार्थ्यांना मोफत डान्स शिकवण्याचे काम करतात. तसेच पोलीस दल, आर्मी दल, नेव्ही दल, हवाई दल यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना खास सवलतीमध्ये नृत्य प्रशिक्षण देण्याचे काम करतात. मावळ तालुक्यात वेगवेगळ्या शहरात राहुल देठे यांचे नृत्य क्लास चालतात. मावळ तालुक्यात घरोघरी नृत्य कला पोहचवणे हेच राहुल देठे यांचे मुख्य ध्येय आहे. पुरस्कार आणि सन्मानाबद्दल सध्या राहुल देठे यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होतो आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– कुंडमळा इथे वाहून गेलेल्या दुसऱ्या युवकाचा मृतदेह सापडला, कुटुंबीयांनी फोडला हंबरडा
– मावळ तालुक्यातील कामशेत इथे तीन देशी बैलांना कत्तलीपासून वाचवण्यात यश!
– तळेगावात अजित फाऊंडेशनमध्ये अॅडविक हाय-टेक कंपनीच्या सीएसआर निधीतून संगणक लॅब