व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मानाची दगडी गोटी उचलणे स्पर्धा ; होळी व धुळवड सणानिमित्त पारंपारिक शिवकालीन मर्दानी खेळाचे आयोजन । Vadgaon Maval

ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात ही स्पर्धा होणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 10, 2025
in लोकल, मावळकट्टा, शहर
Stone-Lifting-Competition

File Image - Stone Lifting Competition Vadgaon Maval


Dainik Maval News : जय बजरंग तालीम मंडळ ट्र्स्ट वडगाव मावळ यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे होळी व धुलवड सणानिमित्त पारंपारिक मानाची दगडी गोटी उचलणे स्पर्धा व स्व. पै. केशवराव ढोरे क्रिडा पुरस्कार उत्कृष्ट खेळाडू २०२५ कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दिनांक १४ मार्च रोजी सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे.

यावेळी शिवप्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात येणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुनील शेळके, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, तहसीलदार विक्रम देशमुख, वरिष्ठ पोलीस निरिक्षक कुमार कदम, मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम उपस्थित राहणार आहेत. जय बजरंग तालीम मंडळाचे अध्यक्ष मंगेश रविंद्र तुमकर यांनी ही माहिती दिली.

  • ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात ही स्पर्धा होणार आहे. वरिष्ठ गट (20 वर्षे वयपेक्षा अधिक) व कुमार गट (20 वर्षे वयपेक्षा कमी) या दोन गटात ही स्पर्धा होणार असून तालीम मंडळाचे संचालक यांच्याकडून विजेत्यांना चषक देण्यात येणार आहे. यासह २०२४ – २०२५ या दोन वर्षांत बैठका मारून रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या खेळाडूला स्व. पै. केशवराव ढोरे यांच्या स्मरणार्थ वस्ताद उमेश प्रकाश ढोरे यांच्याकडून मानाची चांदीची गदा देण्यात येणार आहे.

यासह माजी राष्ट्रीय चॅम्पियन खेळाडू पै. चंद्रकांत सातकर, पै. संभाजी राक्षे, पै. तानाजी काळोखे, पै. राजाराम पाटील, पै. केतन घारे, पै. भक्ती जांभूळकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पंचक्रोशीतील नागरिक, खेळाडू यांनी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाबाबत नवीन डेडलाईन ; 10 एप्रिलपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Lonavala News
– संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा ; भंडारा डोंगर येथे आजपासून गाथा पारायण व कीर्तन महोत्सव
– रसायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई ; पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर पर्यावरण मंत्र्यांची भूमिका


Previous Post

अजित पवार आज विक्रम रचणार ; नवीन महायुती सरकारचा पहिला तर अर्थमंत्री म्हणून अजित पवारांचा 11 वा अर्थसंकल्प । Maharashtra Budget 2025

Next Post

तळेगाव – शिक्रापूर रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी ! अजित पवारांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा, आमदार शेळकेंचे प्रयत्न यशस्वी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra Budget 2025 Ajit Pawar Big announcement Talegaon Chakan Shikrapur Road

तळेगाव - शिक्रापूर रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी ! अजित पवारांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा, आमदार शेळकेंचे प्रयत्न यशस्वी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.