आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहर आणि परिसरात शांतता सुव्यवस्था राखण्याच्या हेतूने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या वतीने मंगळवारी (दिनांक 27 जून) रोजी पथसंचलन करण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे शाळा, मारुती मंदिर चौक, तेली अळी चौक, राजेंद्र चौक, जामा मस्जिद, गणपती चौक, शाळा चौक, सुभाष चौक, जिजामाता चौक, मारुती मंदिर चौक या मार्गे पोलिसांनी संचलन केले. समाजबांधवांना आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या शुभेच्छा देत शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन तळेगाव दाभाडे पोलिसांनी केले आहे. ( Street movement by Talegaon Dabhade police in wake of Ashadhi Ekadashi and Bakri Eid )
यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांच्या नेतृत्वाखाली 3 सहायक पोलिस निरीक्षक, 25 अंमलदार तसेच पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आरसीपी पथक क्रमांक तीनचे जवान पथसंचलनात सहभागी झाले होते.
अधिक वाचा –
– वरसोली शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र एरंडे यांचा ग्रामस्थांकडून कृतज्ञतापूर्वक निरोप समारंभ, नव्या मुख्याध्यापिकेंचेही स्वागत
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहनचालक आणि प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, लगेच वाचा