वैध मापन शास्त्र यंत्रणेने अचूकतेची पडताळणी केलेली वजने, मापे आणि तोलन उपकरणे उपयोगकर्त्यांनी वापरणे कायद्यान्वये बंधनकारक आहे. अनाधिकृत वजन काटे यांच्या विक्री व वापरावर बंदी असून उपयोगकर्त्यांनी त्याचा वापर करु नये, असे आवाहन पुणे वैध मापन शास्त्र कार्यालयाने केले आहे.
वजने व मापे यांचा वैध विक्री परवाना असलेल्या परवानाधारकाने वैध वजने मापे व तोलन उपकरणे यांची विक्री करणे आवश्यक असताना देखील काही व्यापारी विविध देशातून आयात केलेले (चिनी बनावटीचे) किंवा इतर राज्यातून आणलेले अप्रमाणित इलेक्ट्रॉनिक्स काट्यांवर अनाधिकृत व्यक्ती त्यांचे स्टिकर वजन काट्यांना लावून विक्री करत असल्याचे वैध मापन कार्यालयाच्या निदर्शनास आलेले आहे. हे इलेक्ट्रॉनिक्स काटे अप्रमाणित असल्यामुळे त्यांची विक्री अथवा उपयोगकर्त्याने वापर करणे बेकायदेशीर आहे.
अप्रमाणित इलेक्ट्रॉनिक्स काट्यांची विक्री अथवा वापर केल्याचे आढळून आल्यास वैध मापन शास्त्र अधिनियम 2009 आणि त्याअंतर्गतच्या नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही वैध मापन शास्त्र कार्यालयाचे उपनियंत्रक डी. जी. महाजन यांनी स्पष्ट केले आहे. ( Strict action will be taken if unauthorized weighing forks are sold or used )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– स्वातंत्र्यानंतर प्रथमच उंबरवाडीतील कातकरी बांधवांना मिळाले जातीचे दाखले; आमदार शेळकेंचे मानले आभार
– वडगाव साखळी रस्त्याच्या कामाबाबत नगरपंचायत प्रशासन ऍक्टिव्ह मोडमध्ये; रस्त्याला अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार
– पवन मावळातील शिळींब गावात भरली ‘भात पिक उत्पादन आणि तंत्रज्ञान विषयावरील शेतीशाळा’, युवा शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद