Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने गुरुवारी (दि.23) शहरातील प्रमुख रस्त्यांवर रहदारी व वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात आली. मारुती मंदिर चौकातून कारवाईची सुरुवात झाली. यानंतर जिजामाता चौक, तळेगाव स्टेशन रस्ता, तळेगाव स्टेशन चौक, वीरचक्र चौक व यशवंत नगर परिसरामध्ये अनधिकृतपणे रस्त्यावर उभ्या केलेल्या हातगाडी, भाजीपाला टपरी आदी अतिक्रमणांवर ही कारवाई केली गेली.
मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्यअधिकारी ममता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक नगररचनाकार विश्वजीत कदम, सहाय्यक विजय नारगुंडे, गणेश कोकाटे, राम सरगर, कर अधिकारी कल्याणी लाडे, स्वच्छता निरीक्षक प्रमोद फुले, तुकाराम मोरमारे, भांडार विभाग प्रमुख सिद्धेश्वर महाजन, अतिक्रमण पथक सहाय्यक विशाल मिंड, वैशाली आडकर, उषा बेल्हेकर आदी अधिकारी कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते.
शहरात अतिक्रमण केल्यास यापुढेही अशीच कारवाई करण्यात येणार असून व्यवसायकांनी रस्त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी सरनाईक यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? पाहा संपूर्ण यादी – महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री
– ‘एमएसआयडीसी’कडून तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाचा मसुदा सादर, आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
– मावळच्या विकासासाठी कटिबद्ध, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार – खासदार श्रीरंग बारणे