Dainik Maval News : मावळ तालुक्यातील हिंदू संघटनांच्या वतीने गुरुवारी (दि. ८ मे) वडगाव मावळ शहरात भव्य निषेध मोर्चा काढून कामशेत, पौड येथील घटनांचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. तसेच येथील घटनांमधील गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, आठवडे बाजारांत येणाऱ्या परप्रांतीयांची चौकशी करावी आणि गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे काढावीत, अशी मागणी करण्यात आली.
पाकिस्तानी पिलावळींचा बीमोड केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. मावळ तालुक्यातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल मावळ, शिवप्रतिष्ठान मावळ, हिंदुराष्ट्र सेना, सह्याद्री प्रतिष्ठान, सफर ३६१ किल्ल्यांची मावळ, भटकंती सह्याद्रीची सामाजिक प्रतिष्ठान या हिंदू संघटनांच्या वतीने वडगाव मावळ शहरात निषेध मोर्चा काढून पंचायत समिती समोरील चौकात निषेध सभा घेण्यात आली.
- अमोल पगडे, सचिन शेडगे, सोमनाथ दाभाडे, बाळा खांडभोर, रामदास पडवळ, दिगंबर थोरवे आदींनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत हिंदू संघटनाच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरू असा इशारा दिला.
यावेळी अमोल पगडे, महेंद्र असवले, आकाश वारुळे, अमित भेगडे, रोहन निकटे, राजश्री वाकचौरे, मृदुला वैशंपायन आदी उपस्थित होते. याप्रसंगी तहसीलदार विक्रम देशमुख, पोलीस निरीक्षक कुमार कदम यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कामशेत येथे पाकिस्तानी झेंडे उचलणाऱ्या महिलेची चौकशी झाली पाहिजे. पौड घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई करून मावळ तालुक्यातील सर्व मंदिरांमध्ये सीसीटीव्ही बसवले पाहिजेत, आदी प्रमुख मागण्या केल्या आहेत.
अधिक वाचा –
– मावळ मनसेत पडणार खिंडार? माजी तालुकाध्यक्ष शरद पवारांच्या पक्षात जाणार? नेत्यांच्या भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण । Maval News
– मावळमध्ये काँग्रेसला मोठा झटका ! युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षाने सोडला ‘हात’, शिवसेनेला देणार साथ । Maval News
– लोणावळ्यात शिवसेना उबाठा पक्षाला खिंडार ! अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत पक्षप्रवेश
– मुंबई-पुणे प्रवास होणार सुखकर ! राज्य सरकारचा महत्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अंतिम टप्प्यात । Mumbai Pune Missing Link