मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) किल्ले लोहगड ( Lohgad Fort ) येथून पर्यटन ( Tourists ) करुन माघारी परतत असलेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा दुधिवरे खिंडीजवळ ( Dudhiware Khind ) भीषण अपघात ( Student Bus Accident ) झाला. या अपघातात बस तब्बल तीनशे फुट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच लोहगड घेरेवाडी येथील स्थानिक तरुण, शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा आणि पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. ( Student Bus Accident Near Dudhiware Khind While Returning After Lohgad Fort Tour )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
साठे क्लास पेन येथील 27 विद्यार्थी आणि शिक्षक असे सर्वजण बसने लोहगड येथे सहलीसाठी आले होते. त्यापैकी एक बस लोहगड येथून खाली उतरताना दरीत पलटी झाली. बस क्रमांक MH 06 S 9381 या बसचा अपघात झाला. या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.
सदर ठिकाणी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस पथक, शिवदुर्ग टीम, लोहगड घेरेवाडी आणि औंढोली येथील पोलीस मित्र, पर्यटक यांनी मदत केली आहे. सरपंच नागेश मरगळे, पोलीस पाटील सचिन भोरडे, उपसरपंच गणपत महाराज ढाकोळ, लक्ष्मण साबळे, दत्तू विखार, भरत भोरडे, पंढरी विखार, मयूर ढाकोळ, चेतन विखार, बाळू गवारी आदींनी तातडीने मदत केली.
अधिक वाचा –
– जागतिक दिव्यांग दिनानिमित्त 95 लाभार्थ्यांना दिव्यांग निधीचे चेक वाटप, बाजीराव ढमालेंनी मांडल्या दिव्यांगांच्या समस्या
– मोठी बातमी! पुणे-लोणावळा लोकल रेल्वेच्या फेऱ्या वाढणार
– ‘आदिम कातकरी सेवा अभियान’ अंतर्गत आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून कातकरी बांधवांना जातीचे दाखले वाटप