Dainik Maval News : मावळ तालुक्यातील देवघर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिलाटणे गावचे सुपुत्र सुभाष ज्ञानदेव भानुसघरे यांना शैक्षणिक, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुणे येथे झालेल्या या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्रसिद्ध सिने दिग्दर्शक ओमकार माने, शेषराव चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या स्मिता चावडा, कांचन आहेर, उद्योजिका सुजाता चिंता, शंकर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
- सुभाष भानुसघरे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवघर येथे सध्या मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी बावीस वर्षे त्यांनी शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य केले आहे. त्यांच्या कार्यकाळात करंडोली, देवघर येथे सुसज्ज शाळा उभारण्यात आल्या. नुकतेच देवघर गावातील नवीन जिल्हा परिषद शाळांचे बांधकाम प्रसिद्ध उद्योगपती अजय कौल यांच्या माध्यमातून पूर्ण झाले, ज्याचे उद्घाटन आमदार सुनिल शेळके यांनी केले.
शिक्षणासह भानुसघरे हे सामाजिक, सांप्रदायिक सोहळ्यांमध्ये निवेदक म्हणून काम करतात. सोबतच, मावळ तालुका शिक्षक संघाचे उपाध्यक्ष, मावळ तालुका निवेदक संघाचे कार्याध्यक्ष, मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे उपाध्यक्ष, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पादुका सेवा ट्रस्टचे मुख्य विश्वस्त अशी पदे त्यांनी भूषवली आहेत
यापूर्वीही त्यांना मावळ तालुक्यातील अनेक संस्थाकडून आदर्श गुणवंत शिक्षक, प्रसिद्ध निवेदक म्हणून पुरस्कार मिळालेले आहेत. आता त्यांना मिळालेल्या ‘महाराष्ट्र रत्न गौरव’ पुरस्काराबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक