व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ढाक भैरी गडावर वाट चुकलेल्या पर्यटकांच्या शोधमोहिमेचा थरार!! मुसळधार पाऊस, काळाकुट्ट अंधार अन्…

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेल्या मावळ तालुक्यातील ढाक भैरी या डोंगर गडावर पर्यटनासाठी वर्षभर अनेक ट्रेकर्स येत असतात.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 29, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल
dhak-bhairi-maval-taluka

Photo Courtesy : Nilesh Garade


सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेल्या मावळ तालुक्यातील ढाक भैरी या डोंगर गडावर पर्यटनासाठी वर्षभर अनेक ट्रेकर्स येत असतात. हौशी आणि साहसी पर्यटकांसाठी हा परिसर नेहमीच खुणावत असतो. मात्र अनेकदा माहितीच्या अभावी आणि अतिसाहसाच्या नादात पर्यटक या ठिकाणी चुकतात किंवा फसतात. असाच प्रकार मंगळवारी घडला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्युट वडगाव येथे शिक्षण घेत असलेले 4 विद्यार्थी मित्र मंगळवारी ढाक भैरीच्या गडावर ट्रेकिंगसाठी गेले होते. कोंडेश्वर मार्गे धाक भैरीवर त्यांनी चढाई केली. गड चढत असतानाच चौघेही रस्ता चुकले. त्यांना परतीचा मार्ग लक्षात येईना. आपण चुकलोय हे समजताच त्यांनी अनेकांना मदतीसाठी फोन केले. ( Success in rescuing stranded tourists at Dhak Bahiri Maval Taluka )

शेवटी शिवदुर्ग मित्र लोणावळा, आपला मित्र मावळ, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, कामशेत पोलीस आणि कोंडेश्वर ग्रामस्थ यांनी या मुलांना शोधण्याची मोहीम सुरू केली. मंगळवारी रात्री नऊ वाजता शोध मोहीम सुरू झाली. चार तास अथक शोध घेतल्यानंतर बुधवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास रस्ता चुकलेले चौघे कुसुर पठाराजवळ आढळले.

चेतन कबाडे, सुमीत शेंडे, आमोल मोरे, आदित्य सांगळे अशी सुटका केलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. बचाव पथकातील स्वयंसेवकांनी चारही मुलांना सुखरुप खाली आणले. ढाक भैरी हा सह्याद्री पर्वतरांगेतील चढाई करण्यासाठी अतिशय अवघड असलेला भाग मानला जातो.

शिवदुर्ग मित्र लोणावळाचे सुनिल गायकवाड, महेश म्हसणे, योगेश उंबरे, रतन सिंग, हर्ष तोंडे, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे, आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष गणेश निसाळ, गणेश ढोरे, विनय सावंत, सत्यम सावंत, शुभम काकडे, कमल परदेशी, जीगर सोलंकी, विकी दौंडकर, साहील नायर व पोलीस पाटील यांनी या शोध मोहिमेत सहभाग घेतला.

अधिक वाचा –
– अबब..!! कामशेतमध्ये आढळला तब्बल 8 फूटी अजगर, वन्यजीव रक्षक मावळच्या शिलेदारांकडून जीवदान
– लोणावळा शहराजवळील ‘या’ प्रसिद्ध पर्यटनस्थळी वर्षाविहारासाठी जाण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, थेट 144 (1) केलाय लागू


Previous Post

एकच नंबर..! आपल्या मावळातील गहुंजे स्टेडियमवर होणार क्रिकेट वर्ल्डकपचे 5 सामने, पहिला सामना भारताचा, बघा वेळापत्रक

Next Post

महागाव इथे कृषि संजिवनी मोहिम प्रशिक्षण कार्यक्रम; शेतकऱ्यांना चारसुत्री पद्धतीने भात लागवडीबाबत मार्गदर्शन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Krishi-sanjivani-Mission

महागाव इथे कृषि संजिवनी मोहिम प्रशिक्षण कार्यक्रम; शेतकऱ्यांना चारसुत्री पद्धतीने भात लागवडीबाबत मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.