Dainik Maval News : पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेलच्या जिल्हा अध्यक्ष पदी सुहास बळीराम गरूड यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक न्याय सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे यांनी गरूड यांची निवड जाहीर केली.
आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते सुहास गरूड यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, जमीन हक्क परिषदेच्या अध्यक्षा करूणा सरोदे उपस्थितीत होते.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना वाढीसाठी काम कराल, असा विश्वास नियुक्ती पत्रातून व्यक्त करण्यात आला आहे.
आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना बळकटीसाठी काम करणार असल्याचे सुहास गरूड यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– 30 मे पर्यंत तळेगाव शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आढावा बैठकीत आमदार सुनील शेळके यांची सूचना । MLA Sunil Shelke
– लोणावळा शहरात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार, अनेक आजी-माजी पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल । Lonavala News
– मुंबई-पुणे मिसिंग लिंक : कुठलीही तडजोड न करता पुलाचे काम काळजीपूर्वक करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश । Mumbai Pune Missing Link
– शिळींब गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात ; कीर्तन सोहळ्याला आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती । Maval News