Dainik Maval News : मावळच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) उमेदवार सुनील शेळके यांच्या विरोधात काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आठ दिग्गज नेत्यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी याबाबत पत्रक प्रसिद्ध केले आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभेमध्ये सन्माननीय आमदार सुनील अण्णा शेळके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी दिलेली होती. या निवडणुकीमध्ये एक लाखाच्या फरकाने सुनील आण्णा शेळके विजयी झाले. या निवडणुकीमध्ये पक्षाचा आदेश डावलून श्री बाबुराव वायकर, श्री सुभाष जाधव, श्री सचिन घोटकुले, श्री अंकुश आंबेकर, श्री शिवाजी असवले, श्री संतोष भेगडे, श्री संतोष मुऱ्हे, श्री नामदेव शेलार वरील नेते व कार्यकर्त्यांनी सुनील आण्णा शेळके यांच्याविरुद्ध उघडपणाने प्रचार केला. पक्षाची शिस्त मोडली. पक्षाचा आदेश डावलला. त्यामुळे पक्ष विरोधी कृती केल्यामुळे जाब विचारला असता वरील सर्वांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामे सादर केले. त्यांनी दिलेले राजीनामे स्वीकारून पक्षाने वरील नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यापुढे वरील व्यक्तीचा पक्षाशी कोणताही संबंध राहणार नाही. याची नोंद मावळ तालुक्यातील जनतेने घ्यावी, असे पत्रक प्रदीप गारटकर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष यांनी प्रसिद्ध केले आहे.
आठही नेत्यांकडून राजीनामे सादर
पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, बाबुराव वायकर, सुभाष जाधव, सचिन घोटकुले, अंकुश आंबेकर, शिवाजी असवले, संतोष भेगडे, संतोष मुऱ्हे, नामदेव शेलार यांनी पक्षातून निलबंन करण्याआधीच आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. यामुळे पक्षाने केलेली कारवाई ही केवळ प्रक्रियेचा भाग असल्याची प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रातून उमटत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कार्यालयाचे बांधकाम पूर्ण ; लवकरच भव्य सोहळ्यासह होणार लोकार्पण
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन
– पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत मावळातील सात मल्लांनी पटकाविली पदके ; तीन पैलवानांची ‘महाराष्ट्र केसरी’साठी निवड