Dainik Maval News : वडगाव मावळ येथील मातोश्री हॉस्पिटल चौकात आज, गुरुवार (दि.27 मार्च) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. पीएमपी बस (क्र. एमएच 14 एचयू 6293), डंपर (क्र. एमएच 14 एचजी 6677) आणि स्विप्ट कार (क्र. एमएच 12 एसई 9824) या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून यात डंपर चालक जखमी झाला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरून घेतलेल्या माहितीनुसार, तीन्ही वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर असताना मातोश्री हॉस्पिटल जवळील चौकात हा अपघात झाला. चौकात नेहमीच्या ठिकाणी थांबलेली पीएमपी बस, पाठीमागून येणारी स्विप्ट कार आणि तिच्या पाठीमागून येणारा ढंपर यांच्यात हा अपघात झाला. अपघातानंतर स्विप्ट कार बस आणि डंपरच्या मध्ये असल्याने तिचे प्रचंड नुकसान झाले.
तर, डंपर मध्ये खडी असल्याने अवजड वाहन ब्रेक लावल्यानंर उलटले, यात डंपरमधील खडी रस्त्यावर सांडली व डंपरची ट्रॉली उलटून खाली पडली, यामुळे डंपरचेही मोठे नुकसान झाले, तर चालक जखमी झाला, त्याला तातडीने मातोश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर चौकात खडी सांडल्याने व अपघातग्रस्त वाहने रस्त्यात उभी राहिल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. अगती वडगाव फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान