व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करा – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

लोणावळा येथील महावितरण विश्रामगृह येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 29, 2025
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Take measures for safety of tourists coming to Lonavala said Dr Neelam Gorhe

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

लोणावळा येथील महावितरण विश्रामगृह येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत गाडे, नायब तहसीलदार अमोल पाटील, शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शरण सोनावणे, नगर पालिका प्रशासन अधिकारी संतोष खाडे, पाणीपुरवठा अभियंता यशवंत मुंडे आदी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, लोणावळा परिसरात थंड हवेची ठिकाणे, कार्ला लेणी, एकविरा देवीचे मंदीर आहेत, याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. परिसरात अपघात, श्वानदंश, सर्पदंश, मधमाशी व वटवाघूळाचे हल्ले, अंमली पदार्थ व दारुचा पुरवठा, आदी बाबी सामोरे येताना दिसत आहेत. त्यामुळे या बाबी विचारात घेता प्रथमोपचार, पोलीस मदत, स्वच्छता, प्रदूषण, पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजनांसोबतच अवैध गुटखा व अंमली पदार्थ वाहतूक विक्री करणाऱ्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही आदी गोष्टी प्राधान्याने कराव्यात.

एकविरा देवीच्या यात्रेवेळी मधमाशा निर्मूलन मोहीम राबवावी, मधमाशापासून बचाव करण्यासाठी संरक्षणात्मक मार्गदर्शिका तयार कराव्यात. जेणेकरून पर्यटकांना त्रास होणार नाही. करण्यात येणाऱ्या या उपाययोजनांची पर्यटकांना माहितीसाठी जनजागृती करण्यात यावी. आपत्कालीन परिस्थिती विचारात घेता आरोग्य विभागाने मुबलक प्रमाणात औषधे उपलब्ध राहतील, याबाबत दक्षता घ्यावी.

पर्यटकांसाठी हेल्पलाईन सुविधा
लोणावळा पोलिसांनी पर्यटकांच्या मदतीच्यादृष्टीने शहरी भागासाठी ९८५०११२४०० आणि ग्रामीण भागासाठी ९१४६०३२९७१ असे हेल्पलाईन क्रमांक सुरु केले आहेत. पर्यटकांनी या क्रमांकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले आहे. पर्यटकांची गर्दी लक्षात घेता पोलिसांनी परिसरात अनुचित प्रकार घडणार नाही, पर्यायाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी नेहमी दक्ष रहावे.

शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे
लोणावळा नगर परिषदेने शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे. जलपुनर्भरण, सौर ऊर्जा निर्मिती, तसेच पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासोबत प्रदूषण होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. डेंग्यू आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्यादृष्टीने डास निर्मूलन मोहीम आयोजित करावी. नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन करावे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय इमारती, विश्रामगृहातील कक्षांच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. महसूल विभागाने तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करुन नागरिकांच्या अधिकाधिक अडीअडचणी निकाली काढाव्यात, असे निर्देशही डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळमधील पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये दहशतवादी कैद? लेकीच्या रिल्समध्ये दोन दहशतवादी कैद झाल्याचा वडिलांचा दावा
– मंथन सामान्य ज्ञान परीक्षा : साते गावातील दोन विद्यार्थी केंद्रस्तरीय यादीत चमकले । Maval News
– पुणे जिल्हा नियोजन समिती बैठक : सर्व तालुक्यांना एकसारखा निधी दिला जाईल । Pune DPDC


Previous Post

‘पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध करा’ ; लोणावळा भेटीत रामदास आठवले यांचे मोठे वक्तव्य । Ramdas Athawale

Next Post

मोठा निर्णय : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्यात आता ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ उभारणार ; 18 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Big decision Maharashtra Tourism Security Force to be set up in state for safety of tourists

मोठा निर्णय : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्यात आता ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ उभारणार ; 18 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.