टाकवे बुद्रुक मुख्य रस्ता ते जाकवेल पर्यंत जाणारा पांदण रस्ता खुला करुन द्यावा यासाठी टाकवे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. रस्ता खुला करुन देत नसल्याने जल जीवन मिशनचे मुख्य पाइपलाइनचे काम काही दिवसांपासून थांबवण्यात आले आहे. पांदण रस्ता खुला करण्यात यावा यासाठी दोन महिन्यांपूर्वी तहसील विभागाकडून पांदण रोडची प्रत्यक्ष स्थळ पाहणी देखील करण्यात आली होती. ज्या शेतकऱ्यांच्या जागेतून रस्ता होणार त्यांच्यासमवेत चर्चा करण्यात आली पुढील दिवसात तहसीलदार स्वतः येऊन रस्ता खुला करुन देतील असे आश्वासन शेतकऱ्यांना महसूल विभागाने दिले होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
मात्र पुढे दोन महिने यावर कुठलीही कारवाई महसूल विभागाने केली नाही. दरम्यान ग्रामपंचायत कडुन एका बाजूने पांदण रस्ता करण्यास जेसीबी च्या साह्याने सुरुवात देखील केली होती. मात्र पुढे एका खासगी कंपनीची जागा असल्याने पुन्हा काम थांबविण्यात आले असल्याने संतप्त नागरिकांनी आज तहसीलदार यांची भेट घेऊन पांदण रस्ता खुला करण्याबाबत पुढील कार्यवाही तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी नायब तहसीलदार अमोल पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी सरपंच सुवर्णा असवले, ग्रामविकास अधिकारी सुभाष बांगर, माजी सरपंच भुषण असवले, पो पाटील अतुल असवले, विश्वनाथ असवले, अनिल असवले, देवराम असवले, गोरख असवले, योगेश मोढवे, संजय असवले, काळुराम असवले, संदीप मोढवे आदीजण उपस्थितीत होते. ( Takwe Budruk village Work of Jal Jeevan Mission stopped Maval Taluka )
का अडवली आहे जलजीवन मिशन पाइपलाइन?
टाकवेतील जाकवेल कडे जाणारा रस्ता सध्या खाजगी जागेतून जात आहे. कालांतराने हा रस्ता देखील बंद झाल्यास जाकवेल कडे जाण्यासाठी पांदण रस्ता एकमेव मार्ग असल्याने जलजीवन मिशन कामा सोबतच पांदण रस्ता देखील मोकळा करावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनसह ग्रामपंचायतची देखील आहे. परंतू पाइपलाइन झाल्यानंतर पांदण रस्ता होईल का नाही, यांची शाश्वती स्थानिक शेतकऱ्यांना नसल्याने जलजीवन मिशन पाईप लाईन देखील सध्या अडविण्यात आली दिसून येत आहे.
अधिक वाचा –
– मराठा समाजही मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढणार! प्रत्येक गावातून असणार ‘इतके’ उमेदवार । Maval Lok Sabha Election 2024
– Breaking! राज्यातील आशा स्वयंसेविकांना शासनाकडून मोठ्ठं गिफ्ट, मानधनात तब्बल 5 हजार रुपयांची वाढ
– विशेष बातमी! …अन् मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी बदलली