तळेगाव दाभाडे येथील एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) चे तिसरे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी (दि. 02) वडगाव येथील भेगडे लाॅन्स मध्ये सर्वोउल्हासाने पार पडले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुचेता भिडे चाफेकर (संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या) उपस्थित होत्या. तर मुख्य प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव (पीएसआय) वडगाव मावळ, स्नेहा प्रहालदका (मिसेस इंडिया इंटरनॅशनल) उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (डिरेक्टर) डॉ. सीतालक्ष्मी अय्यर मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. शेख सर यांनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन स्वागत केले. उडान द जर्नी ऑफ लाईफ या ह्रदयस्पर्शी थीम ला घेऊन इयत्ता पहिली ते 10 वी च्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी एकाहून एक सरस परफॉर्मन्स 100 हुन अधिक रसिक प्रेक्षकांच्या उपस्थित सादर केले. ( Talegaon Dabhade Ampros International School CBSE annual convocation concluded with enthusiasm )
सांस्कृतिक, शैक्षणिक सह-अभ्यासक्रम आणि अतिरिक्त अभ्यासक्रमातील विविध श्रेणीतील विजेत्यांना प्रमुख पाहुणे आणि सन्माननीय अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रावीण्यासाठी आणि यशासाठा बक्षिसे देण्यात आली. पालक शिक्षक संघाचे सर्व कार्यकारी प्रमुख, शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, डान्स मास्टर, भरतनाट्यमच्या शिक्षिका यांच्या भरीव सहकार्याने शाळेचे तिसरे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
अधिक वाचा –
– मावळ भाजपाचे विधानसभा क्षेत्रात ‘गाव चलो अभियान’ । Gaon Chalo Abhiyan by BJP
– दुर्दैवी! धरणात पोहण्याचा मोह जीवावर बेतला, लोणावळा जवळील तुंगार्ली जलाशयात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू । Lonavala News
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांना पितृशोक! Vasantrao Khandge Passed Away